सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना ओव्हरटाइमचे पैसे मी देईन - डोनाल्ड ट्रम्प

  76

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना ओव्हरटाइम पगार देण्याची घोषणा केली. हे दोघेही ८ दिवसांच्या मोहिमेसाठी अवकाशात गेले होते. परंतु तांत्रिक बिघाडामुळे त्यांना अवकाशात ९ महिने अडकून पडावे लागले होते.एलॉन मस्क यांच्या अंतराळयानाच्या मदतीने १९ मार्चला त्यांना सुखरुप परत आणण्यात आले.त्यांना मोहिमेत २७८ दिवसांचा ओव्हरटाइम करावा लागला होता.याचे पैसे आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देणार आहेत.

ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांनी शनिवारी(दि.२२)प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी ट्रम्प यांना अंतराळात अडकून पडावे लागल्याने सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांना काही वाढीव वेतन दिले जाणार आहे का, असे प्रश्न विचारले असता त्यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, याबद्दल कोणीही माझ्याशी कधीच बोलले नाही. गरज पडल्यास मी माझ्या खिशातून पैसे देईन. त्यांना जे सहन करावे लागले त्याच्यापेक्षा ते जास्त नाही. तसेच नासाच्या अंतराळवीरांना परत आणल्याबद्दल ट्रम्प यांनी एलन मस्क यांचे आभार मानले. ते म्हणाले की जर आपल्याकडे मस्क नसते, तर अंतराळवीर बराच काळ तिथे अडकले असते.

अंतराळवीरांच्या प्रवास, राहण्याचा आणि जेवणाचा खर्च नासा उचलते. याशिवाय, ते छोट्या दैनंदिन खर्चासाठी अतिरिक्त ५ डॉलर्स (४३० रुपये) देखील देते. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे वेतन अनुक्रमे $९४,९९८ (रु. ८१,६९,८६१) आणि $१२३,१५२ (रु. १,०५,९१,११५) आहे. याशिवाय, त्यांना अंतराळात घालवलेल्या एकूण २८६ दिवसांसाठी $१,४३० (रु. १,२२,९८०) मिळतील.

Comments
Add Comment

टॅरिफची धमकी देऊनही भारत-रशिया मैत्री 'जैसे थे'च! चिडलेले ट्रम्प म्हणाले "२४ तासांत भारतावर..."

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर भारी कर वाढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. एका

येमेनजवळ मोठी दुर्घटना, आफ्रिकन स्थलांतरितांची बोट बुडाली, ६० हून अधिक जणांचा मृत्यू

सना, येमेन: येमेनच्या किनाऱ्यावर रविवारी एक भीषण बोट दुर्घटना घडली, ज्यात ६० हून अधिक आफ्रिकन स्थलांतरितांचा

भूकंपानंतर आता रशियात ज्वालामुखीचा उद्रेक! राखेचे लोट ६,००० मीटर उंचीपर्यंत

मॉस्को: रशियाच्या कामचटका प्रांतातील Petropavlovsk येथे ८.८ तिव्रतेचा भीषण भूकंप झाल्यानंतर आता याच ठिकाणी ज्वालामुखीचा

पाकिस्तानात ५.१ रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये रविवारी (३ ऑगस्ट) भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. पाकिस्तानच्या नॅशनल

'भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही...' डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आता रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबवू शकतो,

२५% ट्रम्प टॅरिफचा धोका टळला! एक आठवड्यासाठी दिलासा

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर २५ टक्के टॅरिफची घोषणा केली होती, जी १