Navi Mumbai Fire : शिरवणे एमआयडीसीतील कंपनीला लागलेली आग नऊ तासांनी आटोक्यात!

नवी मुंबई : नवी मुंबईतील शिरवणे येथील औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली. काल रात्री ही घटना घडली असून अवघ्या काही क्षणात आगीने रौद्र रुप धारण केले.  या आगीमध्ये कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग विझविण्यासाठी १० हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून तब्बल ९ तासानंतर आग विझवण्यात यश आले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील शिरवणे एमआईडीसीमधील शुभदा कंपनीमध्ये रात्री ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आग इतकी भयंकर होती की आग विझवण्यासाठी अग्नीशम दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. तब्बल नऊ तासानंतर आग आटोक्यात आली आहे. या संदर्भात अग्निशमन विभागाचे अधिकारी एस.एल. पाटील म्हणाले की, घटनास्थळी १२ अग्निशमन गाड्या उपस्थित आहेत. आम्ही लवकरात लवकर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या जीवित आणि मालमत्तेचे नुकसान आणि आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.


दरम्यान, याआगीत कसलीही जीवितहानी झाली नसली तरीही मोठी वित्तहानी झाली आहे. या घटनेवेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली असून संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Comments
Add Comment

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील