Samidha Guru : समिधा गुरुचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर

मुंबई : एखाद्या भूमिकेला प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी अभिनेत्यांना खूप मेहनत घ्यावी लागते. त्या भूमिकेचा योग्यपद्धतीने पाठपुरावा करावा लागतो. ती भूमिका समजून तिचा योग्य आभास करून ती योग्यरीत्या प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचे काम हातावर मोजण्या इतके कलाकार मनोरंजन विश्वात आहेत. यापैकी मनोरंजन विश्वातील मराठी अभिनेत्री अभ्यासू म्हणून समिधा गुरुकडे पाहिलं जातं. अनेक कलाकृतींमधून आपला अभिनयाचे नाणं खणखणीत वाजवणारी ही अभिनेत्री आता नव्या भूमिकेसह  रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘भूमिका’ या नवीन नाटकाच्या माध्यमातून अभिनेत्री समिधा गुरु उल्का या एका महत्त्वाकांक्षी गृहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. क्षितीज पटवर्धन यांनी या नाटकाचे लेखन केले असून, चंद्रकांत कुलकर्णी या नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत. जिगिषा अष्टविनायक निर्मित ‘भूमिका’ नाटकाचा शुभारंभ २८ मार्चला होणार आहे.



आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना समिधा सांगते की, "अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी ही आव्हानात्मक भूमिका आहे. या व्यक्तिरेखेचे वेगवेगळे कंगोरे साकारण्यात आव्हान असले तरी या व्यक्तिरेखेतून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळताहेत. उल्का ही गृहिणीअसली तरी तिला तिची स्वतंत्र मत आहेत. तिची स्वतःची अशी स्वतंत्र भूमिका आहे. उल्का आपली भूमिका आणि मतं आपल्या नवऱ्यासमोर व इतरांसमोर कशाप्रकारे मांडते? हे दाखवताना एका प्रवृत्तीचा आरसा या नाटकातून आपल्यामोर येईल. महिला प्रेक्षकांना तर ही उल्का म्हणजे आपणच आहोत की काय असं ही जाणवू शकतं इतकी ती व्यक्तिरेखा कालसुसंगत आहे."





दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेते सचिन खेडेकर यांचे अमूल्य मार्गदर्शन इतर सहकलाकारांची उत्तम साथ या सगळ्यांमुळे मला वेगळ्या स्तरावर नेणारी भूमिका साकारणं शक्य झाल्याचं समिधा आवर्जून सांगते. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि अभिनेते सचिन खेडेकर या दोन मातब्बर कलावंतांसोबत काम करण्याचा आणि शिकण्याचा आनंद अभिनेत्री म्हणून मला समृद्ध करणारा आहे ‘भूमिका’ या नाटकाच्या निमित्ताने एक सशक्त कलाकृती नाट्यरसिकांना पहायला मिळेल हे निश्चित.


‘भूमिका’ नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीत अशोक पत्की यांचे आहे. प्रकाशयोजना अमोघ फडके तर रंगभूषेची जबाबदारी उलेश खंदारे यांनी सांभाळली आहे. वेशभूषा  प्रतिमा जोशी, भाग्यश्री जाधव यांची आहे. सूत्रधार प्रणित बोडके तर निर्माते दिलीप जाधव, श्रीपाद  पद्माकर आहेत.

Comments
Add Comment

Auto Rickshaw : ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियम न पाळल्यास तीन टप्प्यांत कारवाई

मुंबई : राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 18 ऑगस्टपासून कामापुरते मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे