मुंबई (प्रतिनिधी):मध्य रेल्वेवर रविवारी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक माटुंगा – मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० पर्यंत असेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील.
ठाणे येथून सकाळी ११.२५ ते दुपारी ३.२७ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गाच्या गाड्या मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील, मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि पुन्हा माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत अप आणि डाऊन हार्बर मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येईल . छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत सुटणाऱ्या पनवेल/बेलापूर/वाशी येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला आणि *पनवेल – वाशी* दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर लाईनच्या प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांवरून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल .
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…