London Heathrow Airport : लंडन सबस्टेशनमध्ये भीषण आग...लंडनचा हिथ्रो विमानतळ २४ तासांसाठी ठप्प

  60

लंडनच्या हिलिंग्डन बरोमधील हेस येथे असलेले सबस्टेशन जळाले आहे. त्यामुळे सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेला लंडनचा हिथ्रो विमानतळ २४ तासांसाठी ठप्प झाला आहे. विजेच्या संयत्रामध्ये आग लागल्याने विमानतळाचा विद्युत पुरवठा बंद झाला आहे. यामुळे विमानतळाचे कामकाज, उड्डाणे सर्व बंद झाली आहेत. विमानतळ असा बंद पडणे ही तशी पहिलीच वेळ मानली जात आहे.





पावर स्टेशनला लागलेल्या भीषण आगीमुळे लंडनच्या पश्चिम भागातील हजारो घरांची देखील बत्ती गुल झाली आहे. याच पावर स्टेशनवरून विमानतळाला वीज पुरवठा केला जातो. यामुळे हा विमानतळही बंद करण्यात आला आहे. पावर स्टेशनला लागलेल्या आगीनंतर आजुबाजुच्या १५० लोकांना वाचविण्यात आले आहे. विमानतळानेही प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा पाहता शुक्रवारी विमानतळ बंद ठेवण्याशिवाय कोणता पर्याय नाहीय असे म्हटले आहे. एकही विमान या विमानतळावरून उड्डाण करू शकणार नाही, तसेच उतरूही शकणार नाही. यामुळे प्रवाशांनी विमानतळावर येऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. १० अग्निशमन गाड्या आणि सुमारे ७० अग्निशामक तैनात करण्यात आले असून आजुबाजुच्या लोकांना धुरामुळे आत राहण्यास आणि दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे.



फ्लाइट-ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटराडार २४ नुसार, अनेक उड्डाणे आधीच वळवण्यात आली आहेत. तसेच विमानतळ अधिकाऱ्यांनुसार येते काही दिवस विमानांच्या परिचलनामध्ये व्यत्यय येत राहणार आहे. स्कॉटिश अँड सदर्न इलेक्ट्रिसिटी नेटवर्क कंपनी मध्य आणि दक्षिण इंग्लंड तसेच स्कॉटलंडच्या उत्तरेकडील सुमारे चार दशलक्ष घरांना वीजपुरवठा करते. या कंपनीने आगीची जागा रिकामी करण्यात आली आहे आणि स्थानिक रहिवासी, आमचे सहकारी आणि आपत्कालीन पथकांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे सांगितले आहे.


विमानतळाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, "अग्निशमन दलाचे जवान मदत करत असले तरी, वीजपुरवठा केव्हा सुरळीत होईल याबद्दल आम्हाला स्पष्टता नाही... परिस्थिती सोडवण्यासाठी आम्ही शक्य तितके प्रयत्न करत आहोत."

Comments
Add Comment

शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात कोणते प्रयोग करणार ?

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक : शुभांशू शुक्ला हे अंतराळात गेलेले दुसरे आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर

अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या सोशल मीडियातील अस्तित्वाची चौकशी होणार

वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेत जाण्याचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. आता अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज

३ जणांना फाशी, ७०० जणांना अटक... इराणमध्ये मोसादच्या 'अंडरकव्हर एजंट्स'विरुद्ध जलद कारवाई

इराण इस्रायलच्या अंडरकव्हर एजंट्सविरुद्ध जलद कारवाई तेहरान: इराण आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधी (Iran Israel Ceasefire) 

इराण-इस्रायल युद्ध : ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेमुळे संभ्रम

पश्चिम आशियातील तणाव: ट्रम्प यांचा दावा, इराणने खोडला तेहरान : इराण-इस्रायल युद्धानं नवं वळण घेतलंय. इराणने

Mosquito Sized Drone: चीनने बनवला डासाच्या आकाराचा रोबोटिक्स ड्रोन, लष्करी ऑपरेशन्समध्ये होणार वापर

बीजिंग: चीनमध्ये एक मायक्रो ड्रोन विकसित करण्यात आला आहे, जो आकाराने डासाच्या आकाराचा आहे. यामुळे हा ड्रोन पकडणे

तोंडावर आपटले ट्रम्प,, युद्धबंदीच्या घोषणेनंतर इराणचे हल्ले सुरूच

तेल अविव: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा तोंडावर आपटले आहेत.  इराण इस्रायलमध्ये