खारघर मृत्यू प्रकरण; आयोजक जबाबदार संस्थेवर कारवाई करा

पनवेल (प्रतिनिधी) : खारघरमधील इज्तिमाच्या कार्यक्रमाला आलेल्या रेहान शेख व फैजान शेखने शिवकुमार शर्मा या युवकाला जीवघेणी मारहाण केली आणि या हल्ल्यात शिवकुमार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीव गमवायला लागला. या क्रूर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकाराला जबाबदार असलेल्या संस्थेवर कारवाई करण्याची आणि भविष्यात अशा प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आक्रमकपणे विधिमंडळाच्या अधिवेशनात केली.

खारघर येथील सिडकोच्या कॉर्पोरेट पार्क मोकळ्या भूखंडावर ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ रोजी अंजुमन मदरसा अरेबिया इस्लामिया कासिमुल हक्कानी मस्जिद या संस्थेच्या माध्यमातून इज्तिमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान,सिडकोने परवानगी देताना ध्वनी प्रदूषण,कायदा सुव्यवस्था, रहदारी व अन्य संबंधी घालून दिलेल्या अटी शर्तीचे पालन आयोजकांकडून झाले नाही. इज्तिमाच्या दिवशी सायंकाळी मोहम्मद रेहान शेख व अन्य एका इसमाने आयटी व्यावसायिक शिवकुमार शर्मा या युवकाला जबर मारहाण केली आणि या मारहाणीत सदर युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्या अनुषंगाने शिवकुमार शर्मा या युवकाने तक्रार दाखल खारघर पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. जखमी अवस्थेत पोलीस स्टेशनला असताना डोक्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने अस्वस्थ अवस्थेत शिवकुमार शर्मा यांचा मृत्यू झाला. इज्तिमाच्या आयोजनाच्या अनुषंगाने परवानगी घेताना वाहतूक, पार्किंग, स्वच्छता, सुरक्षा अशा विभागात प्रत्येकी ३०० असे एकूण १२०० व्हॉलिंटिअर लावणार असल्याचे सांगितले होते. तसेच इज्तिमाला ५० हजार लोकं उपस्थित राहणार असल्याचे त्यामध्ये सांगण्यात आले.मात्र,प्रत्यक्षात २ लाखापेक्षा जास्त लोकं या ठिकाणी उपस्थित राहिले. खारघर शहरातील उत्सव चौकाजवळ रस्ता क्रॉस करताना ही मारहाणीची घटना घडली. त्या ठिकाणी वाहतुक पोलीस तसेच आयोजकांचे व्हॉलिंटिअर हजर नव्हते. वाद होतोय, मारामारी होतेय आणि हेल्मेटच्या प्रहाराने जीव जाण्यापर्यंत मारहाण केली जाते मग मदत करायला कुणीही आले नाही जर त्या ठिकाणी आयोजकांचे व्हॉलेंटिअर होते तर त्यांनी यामध्ये मदत करायला हवी होती. मात्र तसे झाले नाही आणि यामध्ये शिवकुमार शर्मा यांचा नाहक जीव गेला. असे सभागृहाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगतानाच विशेष म्हणजे या इज्तिमाला ०४ डिसेंबर २०२४ ते ३० जानेवारी २०२५ पर्यंत अशी तब्बल ५८ दिवसांची परवानगी सिडकोने दिल्याचा प्रकारही त्यांनी उघडकीस आणला.

जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होणार होता तर तशी काळजी घेणे आयोजक संस्थेची जबाबदारी होती. म्हणूनच अप्रत्यक्षरित्या का होईना हि संस्था या मृत्यूला जबाबदार आहे. त्यामुळे अशा संस्थेला भविष्यकाळात कार्यक्रम करण्याची परवानगी देऊ नये तरच लोकांच्या जीविताचे संरक्षण होईल त्यामुळे अशी काळजी शासनाने घेण्याचीही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात आक्रमकपणे केली. त्याचबरोबरीने येथे जो कार्यक्रम झाला त्या खारघर ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात अनधिकृत मशिदी उभ्या राहत आहेत. या ठिकाणी हॉटेल बेसमेंटमध्ये नमाज पठणासाठी वेगवेगळ्या सुविधा मिळणार अशा ऑफर केल्या जातात त्या आशयाचे स्टिकर रेल्वेमध्ये लावले जात आहेत. आणि त्या अनुषंगाने आता खारघर तळोजा परिसराचा मुंब्रा करण्याचा घाट घातला जात आहे. आणि या प्रयत्नांना येथे कायद्याला कुठल्याही प्रकारचा स्थान नाही अशी स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे या ठिकाणी असे प्रकार वारंवार घडणार असतील तर ती थांबवण्याची जबाबदारी शासनाची आहे. मुंबईची संस्था खारघरमध्ये आयोजन करते आणि नियम पायदळी तुडवते त्यामुळे भविष्य काळामध्ये असे कार्यक्रम आयोजनाला परवानगी देऊ नये अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली.
Comments
Add Comment

BMC Election 2026 : मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजप-शिंदे गटाची जोरदार मुसंडी! भाजप ११, तर शिंदे गट १० जागांवर आघाडीवर

११४ च्या मॅजिक फिगरकडे महायुतीची वेगाने वाटचाल मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा 'किल्ला' काबीज करण्यासाठी मैदानात

मुंबईत मतमोजणीला सुरुवात, अशी सुरू आहे मतमोजणी ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

मुंबई मनपासाठी ५२.९४ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे २४० लोकल फेऱ्या रद्द

काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य