Nashik Fire : नाशकात अग्नितांडव! पिंपळगावमध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग; १५ ते २० दुकाने आगीच्या भक्षस्थानी

नाशिक : नाशिकमधील (Nashik News) निफाड तालुक्यात भीषण आग लागल्याची घटना घडली. पिंपळगाव शहरातील एका बांबू गोडाऊनला ही आग लागली असून अवघ्या काही क्षणात आगीने रौद्र रुप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यात यश आले. मात्र यामध्ये १५ ते २० दुकाने जळून खाक (Nashik Fire) झाली असून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे समोर आले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे भीषण आग लागली. घोडके नगर परिसरात असलेल्या एचडीएफसी बँक च्या पाठीमागील भागामध्ये एका रद्दीच्या दुकानालाही आग लागली होती. तसेच त्या नजीकच्या भेळ भत्ता बनवण्याच्या कारखान्यात देखील ही आग लागली. या ठिकाणी असलेल्या गॅसच्या टाक्यांचा स्फोट झाल्याने रौद्ररूप धारण केले. त्यात शेजारी असलेल्या बांबूच्या व लाकडांच्या वखारीला देखील ही आग लागली. त्यामुळे आग आणखी भडकली. आग एवढी भीषण होती की ओझर एच एल, पिंपळगाव बसवंत, निफाड येथून तीन अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्याचे प्रयत्न करत होते. (Nashik Fire)


दरम्यान, तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने यात कसलीही जीवितहानी झाली नसली तरीही लाखोंचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर द्यापही काही ठिकाणी ही आग भडकत असल्याने अग्निशमन दल घटनास्थळी तळ ठोकून आहे. (Nashik Fire)

Comments
Add Comment

Pune Fire News : धुराचे लोट आणि फटाक्यांचे स्फोट! पिंपरी-चिंचवडमध्ये गजानन रुग्णालयाखाली अग्नितांडव; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

पुणे : पिंपरी-चिंचवड : औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात आज दुपारी आगीची एक मोठी घटना

नववर्षाची पार्टी बेतली जीवावर! ४०० फुट दरीत कोसळलेल्या तरूणाला रेस्क्यू टीमने दिले जीवनदान

सातारा: नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण पार्टी आणि सहलीला बाहेर गेले आहेत. पार्टी म्हटल्यावर मद्य आणि मांसाहार,

Shirdi New Year 2026 : शिर्डीत साईनामाच्या जयघोषात नववर्षाचे स्वागत! तरुण पिढीची साईचरणी मांदियाळी; साईनगरी भाविकांनी दुमदुमली

शिर्डी : सरत्या वर्षाला निरोप देऊन २०२६ या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण साईनगरी सज्ज झाली होती.

कसबा गणपती मूर्तीवरील शेंदूर कवचाची दुरुस्ती

नऊशे किलो शेंदूर हटवून ऐतिहासिक स्वरूपाचे दर्शन पुणे : पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या मूर्तीचे सुमारे

आणखी एका न्यायालयीन लढ्यात धनंजय मुंडेंचा विजय!

शपथपत्राविरोधात दाखल केलेली फिर्याद परळी न्यायालयाने फेटाळली परळी : माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा आणखी एका

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,