Disha Salian Case : ...म्हणून खासदार नारायण राणे म्हणाले, "आज बाळासाहेब ठाकरे असते तर..."

मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात औरंगजेबाच्या कबरीच्या वादाचे पडसाद उमटले. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी सेलिब्रेटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नवा ट्विस्ट आला आहे. दिशाला न्याय मिळावा म्हणून विधानसभेत महायुतीचे नेते पुढे आले आहेत. अशातच काल(दि २० ) विधानसभेत चित्रा वाघ (chitra wagh) यांनी दिशाला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला. त्यांच्या या कृतीचं खासदार नारायण राणे ( Narayan Rane ) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कौतुक केलं आहे.



दिशा सालियनच्या ( Disha Salian ) मृत्यूनंतर ५ वर्षांनी तिचे वडील सतीश सालियन यांनी कोर्टात धाव घेतली आहे. दिशाच्या मृत्यूप्रकरणी त्यांनी कोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावरुन विधानसभेतही गदारोळ झाला. दिशाच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापन झाली आहे. या चौकशीचा अहवाल कधी येणार ? हा अहवाल सर्वांसमोर यायला हवा. दूध का दूध, पानी का पानी व्हायला पाहिजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी विधानसभेत केली. यावर आता खासदार नारायण राणे यांनी ट्वीट करत चित्रा वाघ यांची पाठ कौतुकाने थोपटली आहे.





ट्विट करत काय म्हणाले खासदार नारायण राणे ?


"छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात एका निरपराध मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्यांना आपण चव्हाट्यावर आणले. आपल्याला विरोध करणाऱ्यांच्याही तुम्ही चिंधड्या उडविल्या. तुमच्यासारख्या लढवय्या वाघिणींची महाराष्ट्राला गरज आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी तुमचा गौरव केला असता. लगे रहो चित्राताई" म्हणत खासदार नारायण राणे यांनी चित्रा वाघ यांचं कौतुक केलं.





दरम्यान खासदार नारायण राणे यांच्या ट्विटला चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे. "धन्यवाद राणे साहेब…..उसूलों पे जहाँ आँच आये टकराना ज़रूरी है, जो ज़िन्दा हों तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है. मी सत्यासाठी... न्यायासाठी... अशीच लढत राहीन आणि जेव्हा तुमच्या सारखे ज्येष्ठ नेते पाठीशी उभे राहतात तेव्हा लढण्याची ताकद आणखीनच दुणावत. " असं चित्रा वाघ म्हणाल्या.

Comments
Add Comment

मुंबईतील २५२ कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा: सलीम शेखच्या कबुलीजबाबाने खळबळ

मुंबई : देशभरात खळबळ माजवणाऱ्या २५२ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) प्रकरणात पोलिसांना आणखी एक मोठा धागा मिळाला

घाटकोपरमध्ये रस्ता रुंदीकरणातील अडथळा झाला दूर

बाधित २४ बांधकामांवर झाली अखेर कारवाई मुंबई (खास प्रतिनिधी) : घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते

उत्तर पश्चिम जिल्ह्यात महायुतीचे ३२ ते ३३ नगरसेवक निवडून आणणार

भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड ज्ञानमूर्ती शर्मा यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई (सचिन धानजी) : उत्तर पश्चिम लोकसभा

लाडकी बहीण योजनेची वेबसाईट होत आहे अपग्रेड

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे. या योजनेचा सोळावा

दहिसरच्या राजकारणात उलथापालथ, वॉर्ड क्रमांक १ घोसाळकर कुटुंबाच्या आवाक्याबाहेर!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण राजकारणात हालचाली सुरू झाल्या आहेत. दहिसरमधील

शीतल म्हात्रे यांचा मोठा निर्णय : महापालिका निवडणूक लढवणार नाही, आमदारकीवर लक्ष केंद्रित!

मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.