धनश्रीसोबतच्या घटस्फोटाच्या दिवशी हे टीशर्ट घालून पोहोचला चहल, होतेय जोरदार चर्चा

मुंबई: भारतीय संघाचा स्टार स्पिनर युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. दोघांच्या घटस्फोटाच्या निर्णय २० मार्चला मुंबईच्या वांद्रे येथील हायकोर्टात देण्यात आला. वकिलांनी सांगितले की घटस्फोट झाला आहे, दोघांचे लग्न तुटले आहे.


दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचे लग्न २२ डिसेंबर २०२०मध्ये झाले होते. वांद्रे हायकोर्टादरम्यान चहल जो टीशर्ट घालून आला होता त्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.


चहलच्या टीशर्टवर 'Be your own sugar daddy' असे लिहिले होते. याचे फोटोज आणि व्हिडिओ अनेकांनी शेअर केले. 'Be your own sugar daddy'हे असे वाक्य आहे ज्याचा वापर अनेकदा अशा व्यक्तीसाठी केला जातो जी आर्थिक मदतीसाठी अथवा गिफ्टसाठी एखाद्यावर अवलंबून राहण्याऐवजी आर्थिकपणे स्वतंत्र असेल.


 


सोशल मीडयावर अनेक युजर्सना असे वाटते की चहलने हे टीशर्ट धनश्रीला चिडवण्यासाठी घातले होते. चहल आणि धनश्रीने २०२०मध्ये लग्न केले होते आणि जून २०२२पासून ते वेगळे राहत होते. या जोडीने ५ फेब्रुवारीला आपापसातील संमतीने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती.

Comments
Add Comment

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!

लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका मुंबई  : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी

इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर