राज्यसभेत अमित शाहांचा प्रहार, तामिळनाडूतील हिंदी वादावर विरोधकांना घेरले

  58

नवी दिल्ली: राज्यसभेत आज केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी गृहमंत्रालयाशी संबंधित अनेक उत्तरे देत विरोधकांवर प्रहार केले. अमित शहा यांनी काश्मीरच्या मुद्द्यांपासून ते अनेक मुद्द्यांवर विरोधकांना घेरले. इतकंच नव्हे तर तामिळनाडूतील हिंदी मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकारणावरून स्टॅलिन यांच्यावर जोरदार प्रहार केले.


या वादाबद्दल बोलताना अमित शाह यांनी यावेळी मोठी घोषणा केली. ते म्हणाले, की मी घोषणा करतो की डिसेंबरनंतर मी कोणत्याही राज्यातील व्यक्ती असो वा मुख्यमंत्री तसेच खासदार यांच्याशी त्यांच्या भाषेतूनच पत्रव्यवहार करणार. हे भाषेच्या नावावर दुकान चालतात आपले भ्रष्टाचार लपवण्यासाठी.त्यांच्यासाठी हे मजबूत उत्तर आहे. भारतातील एकएक भाषा ही भारताच्या संस्कृतीचे दागिने आहेत. आम्ही भाषाविरोधी आहोत का? कोणी राज्यांच्या भाषांना का विरोध करेल? आम्हीही तेथूनच येतो.


मी गुजरातमधून येतो तर निर्मलाजी तामिळनाडूच्या आहेत. कसा कोणी भाषांना विरोध करेल. आम्ही भाषांसाठी काम केले आहेत. आम्ही मेडिकल आणि इंजीनियरिंगच्या परीक्षांना भारताच्या भाषांमध्ये अनुवादित केले आहे. मी तामिळनाडू सरकारला चॅलेंज देतो की दोन वर्षांपासून तुमच्यामध्ये हिम्मत नाही की तुम्ही मेडिकल अथवा इंजीनियरिंगची परीक्षा तामिळ भाषेत अनुवादित करू शकलात? कारण त्यात तुमचे आर्थिक हित दडलेले आहे.तुम्ही हे करू शकत नाही. मात्र आमचे सरकार आल्यावर आम्ही मेडिकल आणि इंजीनियरिंगच्या परीक्षा तामिळमध्ये घेऊ.


भाषेच्या नावावर विष पसरवणाऱ्यांना सांगू इच्छितो की हजारो किमीची कोणतीतरी भाषा तुम्हाला जवळची वाटते मात्र आपली भारतीय भाषा चांगली वाटत नाही. तामिळ मुलगा गुजरातमध्येही काम करू शकतो. दिल्लीतही आणि काश्मीरमध्येही काम करू शकतो. कशी देशाची व्यवस्था हवीये. भाषेच्या नावावर तुम्ही जे देशाचे विभाजन करण्याचा विचार करत आहात ते बंद करा. देश प्रगती करत आहे. देश पुढे गेला आहे. तुम्ही विकासाच्या गोष्टी करा. भाषेच्या आड येऊन तुमचे घोटाळे, भ्रष्टाचार लपवू नका...अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

Comments
Add Comment

DRDO गेस्ट हाऊसच्या मॅनेजरला हेरगिरी प्रकरणात अटक

नवी दिल्ली: ज्योती मल्होत्रानंतर भारतातील गुप्तचर यंत्रणानी आणखी एका हेराला अटक केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर

Uttarkashi Cloud burst: उत्तरकाशीच्या धारलीमध्ये ढगफुटी, डोंगरावरून वाहत आले हजारो टन पाणी, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्यात गाडले, पहा VIDEO

उत्तरकाशी: उत्तरकाशीमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे सर्वत्र हाहाकार पसरला आहे. येथील धारली गावात आलेल्या

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात

PM Modi : एनडीएच्या बैठकीत मोदींचा सत्कार; 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'महादेव'च्या यशावर अभिनंदनाचा वर्षाव! पाहा VIDEO

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्ली येथे झालेल्या एनडीए संसदीय

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम