मुंबईतील रस्त्यांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार - उदय सामंत

मुंबई: मुंबईतील रस्त्यांचे वेगाने काँक्रिटीकरण करणे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी संकल्प आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईतील सर्व आमदारांच्या मागण्या जाणून घेतल्या जातील आणि त्या लवकरच पूर्ण केल्या जातील, अशी माहिती उद्येाग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य अतुल भातखळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर सदस्य अमित साटम, अमित देशमुख, आदित्य ठाकरे, योगेश सागर, मुरजी पटेल,अमीन पटेल, वरुण सरदेसाई यांनी उपप्रश्न विचारले.

उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू असून काही कामांमध्ये तडे आढळून आल्याने संबंधित कंत्राटदार आणि गुणवत्ता व्यवस्थापन संस्थेवर कारवाई करण्यात आली आहे. दोषयुक्त कामाचे प्रमाण एकूण कामाच्या ०.४ टक्के इतके असून, दोषयुक्त कामांसाठी कंत्राटदार आणि गुणवत्ता व्यवस्थापन संस्थेवर प्रत्येकी ३.३७ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दोषयुक्त काम कंत्राटदाराकडून स्वखर्चाने नव्याने करून घेतले जात आहे. तसेच, पर्यवेक्षण करणाऱ्या ९१ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांचा खुलासा मागवण्यात आला आहे.

या रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येणार असल्याचेही उद्येाग मंत्री सामंत यांनी सांगितले.

Comments
Add Comment

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; दिल्ली-एनसीआरला मिळाले दुसरे आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वार

नवी दिल्ली : देशाच्या विमान वाहतूक क्षेत्रात मोठी झेप घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील जेवर

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तिपत्र  मुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

मुंबईत ३४० झाडांचा गुदमरलेला श्वास झाला मोकळा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेकडून सन २०२५ मध्ये तब्बल ३४० वृक्षांभोवतीचे काँक्रिट काढण्यात आले

समुद्रात जाणारा कचरा रोखण्यासाठी आवश्यक त्याठिकाणी ‘ट्रॅश बूम’

मुंबई : ट्रॅश बूममुळे नदी, नाले आणि समुद्रात तरंगणारा कचरा अडवला जातो. प्रामुख्याने नाल्यांच्या तोंडावर लावल्या

नालेसफाईच्या कामाला गती, मिठी नदीच्या सफाईला रविवारपासून होणार सुरुवात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये नाल्‍यातून गाळ

देशात इंधनाचा तुटवडा नाही, तरीही पंतप्रधान मोदींची स्ट्रॅटर्जी तयार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई मुंबई : जागतिक स्तरावर इंधनाचे मोठे संकट उभे