नाशिकमधील म्हाडाच्या ५०२ घरांसाठी ९०४ अर्ज

  37

मुंबई (प्रतिनिधी): म्हाडाच्या नाशिक गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने २० टक्के समावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत ४९३ परवडणाऱ्या घरांसाठी सुरू केलेल्या ऑनलाईन प्रक्रियेच्या अखेरच्या दिवशी ९०४ अर्ज प्राप्त झाले. यामध्ये म्हाडा योजनेच्या घरांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या योजनेत काठेगल्लीतील रामबाग या प्रकल्पासाठी सर्वाधिक प्रतिसाद मिळाला असून २२ सदनिकांसाठी १५६ अर्ज प्राप्त झाले आहेत. मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णता ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली असून एप्रिल महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या योजनेची सोडत काढण्यात येणार असल्याचे म्हाडाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.



विकासकांकडून नाशिक मंडळाला २० टक्के योजनेतील घरे देण्यास टाळाटाळ होत आहे. मात्र तरीही म्हाडा प्राधिकरण आणि नाशिक मंडळ ही घरे मिळविण्यासाठी सातत्याने नाशिक महानगरपालिकेसह विकासकांकडे पाठपुरावा करत आहे. या पाठपुराव्यामुळे नाशिक मंडळाला नुकतीच २० टक्क्यातील ४९३ घरे उपलब्ध झाली आहेत. यामध्ये नाशिक मधील मखमलाबाद शिवार, सातपूर शिवार, पाथर्डी शिवार, विहितगाव शिवार, हिरावाडी, म्हसरुळ शिवार, तपोवन द्वारका, वडाळा नाशिक शिवार, पिंपळगाव बहुला, नांदुर दसक, देवळाली, मौजे दसक या ठिकाणी विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २० टक्के सर्वसमावेशक घटकांतर्गत ५०२ सदनिकांसाठी लॉटरी काढण्यात आली.



सर्वसाधारण लॉटरीव्दारे २९१ घरे तर प्रथम येणारयास प्रथम प्राधान्यानुसार २०२ घरे उपलब्ध झाली या घरांची लॉटरी काढण्यात आली. यामध्ये अल्प उत्पन्न गट, तसेच विविध प्रवर्गांसाठी घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या योजनेत मखमलाबाद रोड परिसरातील गृहप्रकल्पांमध्ये १२ ते १८ लाखांपर्यंत वन आणि टू बीएचके घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत तर सातपूर शिवार, पाथर्डी, शिवार, विहीतगाव शिवार यासह गृहप्रकल्पांमध्ये १३ लाखांपासून घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुख्यमंत्रयांच्या हस्ते एप्रिल महिन्यात या घरांची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. स्विकृत अर्जाची अंतिम यादी ९ एप्रिल रोजी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाणार आहे. सर्वसाधारण लॉटरीव्दारे उपलब्ध २९१ घरांसाठी ७२७ अर्ज प्राप्त झाले तर प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्यानूसार २०२ घरांसाठी १२० अर्ज प्राप्त झाले. सातपुर येथील म्हाडाच्या ७ घरांसाठी ५१ अर्ज तर येथील आरक्षित प्रवर्गातून २ घरांसाठी ६ अर्ज प्राप्त झाले आहेत.
Comments
Add Comment

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल