तीन सामन्यासाठी बदलला राजस्थान रॉयल्सचा कर्णधार

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलचा या वर्षीचा हंगाम दोन दिवसांत सुरु होणार आहे. तत्पूर्वी राजस्थान रॉयल्सने त्यांच्या कर्णधाराबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांचा नियमित कर्णधार संजू सॅमसन याच्या बोटाची दुखापत पूर्ण बरी होईपर्यंत, युवा अष्टपैलू खेळाडू रियान पराग संघाचे नेतृत्व करणार आहे. यादरम्यान सॅमसन विशेष फलंदाज म्हणून संघात सहभागी होणार असल्याची माहितीही राजस्थान रॉयल्सने त्यांच्या एक्स अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत दिली आहे.

सॅमसनने संघाच्या अधिकृत एक्स हँडलवरून व्हिडिओद्वारे ही घोषणा केली आहे की, मी पुढील तीन सामन्यांसाठी पूर्णपणे तंदुरुस्त नाही. संघात अनेक चांगले खेळाडू आहेत. पुढील तीन सामन्यांसाठी रियान संघाचे नेतृत्व करणार आहे. तो हे करण्यास सक्षम आहे, आणि मला अपेक्षा आहे की सर्वजण त्याला पाठिंबा देतील.

राजस्थान रॉयल्सने जाहीर केले आहे की, आयपीएल २०२५ च्या पहिल्या तीन सामन्यांसाठी रियान पराग संघाचे नेतृत्व करेल. हा युवा अष्टपैलू खेळाडू २३ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या पहिल्या सामन्यात, त्यानंतर २६ मार्च रोजी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आणि ३० मार्च रोजी घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात संघाचे नेतृत्व करेल, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

२००४च्या हंगामात रियानची आकडेवारी

रियान परागने अलीकडील हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आयपीएल २०२४ मध्ये, त्याने ५२.०९ च्या सरासरीने आणि १४९.२१ च्या स्ट्राइक रेटने ५७३ धावा केल्या, ज्यात चार अर्धशतके आणि सर्वोत्तम स्कोअर ८४* होता. त्याच्या नेतृत्वाखाली, राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२५ च्या सुरुवातीसाठी चांगली तयारी केली आहे.
Comments
Add Comment

आयसीसी क्रमवारीत भारतीय महिलांचा डंका

शफाली, रेणुकाची झेप; दीप्तीचा 'नंबर १' कायम नवी दिल्ली: आयसीसीच्या ताज्या महिला टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी

विराटसाठी २८ हजार धावांचा टप्पा हाकेच्या अंतरावर

सचिन-संगकाराच्या क्लबमध्ये एन्ट्रीसाठी २५ धावांची गरज मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'किंग' विराट कोहली पुन्हा एकदा

भारताचे मिशन ‘क्लीन स्वीप’ यशस्वी

हरमनप्रीतच्या ६८ धावा; मालिका ५-० ने खिशात तिरुवनंतपुरम : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२०

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट