मुंबई : मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे आपल्या साधेपणामुळे कायमच प्रेक्षकांचं मन जिंकतो. साधा स्वभाव पण पाहिजे तिथे सडेतोड बोलणार अशा शिव ठाकरेने मराठी बिग बॉसची ट्रॉफीही जिंकली होती.यानंतर तो ‘खतरो के खिलाडी’, ‘बिग बॉस हिंदी’सह अनेक रिएलिटी शोजमध्ये दिसला.त्यानंतर आता शिव ठाकरेची आणखी एका रिएलिटी शोमध्ये एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे.
शिव ठाकरे रिअॅलिटी शो मास्टर आहे. जवळपास प्रत्येक शोमध्ये तो दिसला आहे. सध्या टीव्हीवर ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ ची लोकप्रियता आहे. फराह खान शोची होस्ट आहे. रणवीर ब्रार आणि विकास खन्ना हे रिअल लाईफ शेफ या शोमध्ये परीक्षक आहेत. निक्की तांबोळी, उषा नाडकर्णी, तेजस्वी प्रकाश, दीपिका कक्कर, गौरव खन्ना, फैजल शेख, अर्चना गौतम, चंदन प्रभाकर, अभिजीत सावंत हे स्पर्धक दिसले. काही दिवसांपूर्वीच शोमधून दीपिका कक्करने वैयक्तिक कारणांमुळे एक्झिट घेतली. मीडिया रिपोर्टनुसार, आता दीपिकाच्या जागी शिव ठाकरेची शोमध्ये एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे. शिवची चाहत्यांमधील लोकप्रियता पाहता तो मेकर्सने त्याला ऑफर दिली आहे.
शिव ठाकरे शोमध्ये येणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दीपिका कक्कर शेवटच्या दिवशी भावुक झालेली दिसली. तिचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शिव ठाकरे जर आला तर काय रंगत येते हे बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…