Tuesday, April 22, 2025
Homeब्रेकिंग न्यूजराज्यातील सरकारी शाळांना आता सीबीएसई पॅटर्न

राज्यातील सरकारी शाळांना आता सीबीएसई पॅटर्न

मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच एस.एस.सी बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ या वर्षापासून सीबीएससी पॅटर्न लागू होणार असून राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढील लागावी या हेतूने सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात गुरूवारी सभागृहात माहिती देत घोषणा केली. विशेष म्हणजे यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतरही त्यांनी राज्यात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यासंदर्भात आढावा सुरू असल्याचे स्पष्ट केले.

आता व्हॉट्सअ‍ॅपवरून रिक्षा-टॅक्सी चालकांबाबबत तक्रार करता येणार

राज्य अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संदर्भात सुकाणू समितीने मान्यता दिली असून मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेतील प्रश्नावर लेखी उत्तर देत ही माहिती दिली.

‘लिटिल ग्रेसी’ इलेक्ट्रिक स्कूटर लाँच

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रालयातील सर्वच विभागांसाठी पुढील 100 दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला होता. त्यानुसार शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार असा विश्वास शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत त्यांनी व्यक्त केला होता. शिक्षण विभागाने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पाऊले उचलावीत असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान, त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत, त्यानुसार राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना केल्या होत्या.

Disha Salian case : दिशाच्या प्रकरणात वकिलांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, सखोल तपासाची मागणी

सीबीएसईची पाठ्यपुस्तके इंग्रजी व हिंदी माध्यमात उपलब्ध आहेत. मात्र, ती मराठीसह अन्य भाषेत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. शाळांचे वार्षिक वेळापत्रक १५ जूनपासून सुरू होते. पण, नवीन शैक्षणिक सीबीएसईच्या वार्षिक वेळापत्रकानुसार १ एप्रिलपासून सत्राची सुरुवात करण्यासाठी विचार सुरू आहे, असेही भुसे यांनी उत्तरात स्पष्ट केले आहे.
राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली का? असा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी विचारला होता. त्यावर, सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करुन दिली जाणार असे दादा भुसे यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -