Wednesday, April 23, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDisha Salian case : दिशाच्या प्रकरणात वकिलांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, सखोल...

Disha Salian case : दिशाच्या प्रकरणात वकिलांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, सखोल तपासाची मागणी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिवंगत दिशा सालियन हिच्या मृत्यूचा पुन्हा चर्चेत आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिका करुन दिशाच्या मृत्यूची चौकशी नव्याने करण्याची मागणी केली आहे. दिशावर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. उद्धव गटाचे आमदार आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, डीनो मोरिया यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतून केला आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारले असता, दिशाच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी सखोल तपास व्हावा, अशी मागणी वकील निलेश ओझा यांनी केली आहे.

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेला अटक होणार ?

दिशाचा मृत्यू कशा प्रकारे झाला याचे नाट्य रुपांतर करावं. तिच्या वजनाएवढी बाहुली करुन ती पोलीस पंचनाम्याआधारे व्हरांड्यात उभी करुन खाली पाडावी. या चाचणीतून मृत्यू कसा झाला हे सत्य बाहेर येईल, असा विश्वास वकील निलेश ओझा यांनी व्यक्त केला. दिशा तसेच याचिकेत नमूद सर्व व्यक्तींचे घटनेच्या दिवशीचे विशिष्ट वेळेतले मोबाईल टॉवर लोकेशन तपासावे; अशीही मागणी वकील निलेश ओझा यांनी केली आहे. कोविडचे कारण पुढे करुन दिशाचे पोस्टमॉर्टेम मृत्यूला ५० तास होऊन गेल्यानंतर करण्यात आले. या उलट चार दिवसांनी सुशांतचा मृत्यू झाला त्यावेळी पोस्टमॉर्टेम पाच तासांच्या आत झाले होते. हे असे करण्यामागचे कारण कळलेच पाहिजे; अशी मागणी वकील निलेश ओझा यांनी केली आहे.

 

Nagpur Violence : नागपूर दंगल, फहीम खानसह ५० जणांवर देशद्रोहाचा गुन्हा

एक तक्रार आहे. या प्रकरणात तपास करा. जो योग्य असेल त्याला त्रास होणार नाही. ज्याने अयोग्य असे काही केले असेल त्याला तपासाचा त्रास होईल; असे सांगून वकील निलेश ओझा यांनी दिशाच्या प्रकरणात सखोल तपासच सत्य उलगडेल असे सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -