Wednesday, April 23, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्व'लिटिल ग्रेसी' इलेक्ट्रिक स्कूटर लाँच

‘लिटिल ग्रेसी’ इलेक्ट्रिक स्कूटर लाँच

मुंबई : भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारपेठेतील आघाडीची कंपनी असलेल्या झेलिओ ई मोबिलिटीने त्यांचे नवीनतम मॉडेल, लिटिल ग्रेसी, या कमी वेगाच्या, नॉन-आरटीओ इलेक्ट्रिक स्कूटरचे अनावरण केले आहे. ही इ स्कूटर विशेषतः १०-१८ वयोगटातील तरुण रायडर्ससाठी तयार करण्यात आली आहे. या नवीन लॉन्चने कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये एक उल्लेखनीय भर घातली आहे आणि त्यात सुरक्षितता आणि कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करून तरुण लोकसंख्येला लक्ष्य करण्यात आले आहे. लिटिल ग्रेसीला ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नसल्यामुळे, ही स्कूटर एक विश्वासार्ह, पर्यावरणपूरक आणि सोयीस्कर वाहतुकीचा मार्ग शोधणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांसाठी एक आदर्श पर्याय आहे.

लिटिल ग्रेसी तीन प्रकारांमध्ये उपलब्ध असून या इ स्कूटरची किंमत ४९,५०० रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ४८व्ही/३२एएच लीड अ‍ॅसिड बॅटरीची किंमत ४९,५०० रुपये असून ती ७-८ तासांच्या चार्जिंग वेळेसह ५५-६० कि.मी. ची रेंज देते. ६०व्ही/३२एएच लीड अ‍ॅसिड बॅटरीची किंमत ५२,००० रुपये असून ७-९ तासांच्या चार्जिंग वेळेसह ७० कि.मी. ची रेंज देते. तर ६०व्ही/३०एएच लीथियम-आयन बॅटरीची किंमत ५८,००० रुपये असून ८-९ तासांच्या चार्जिंग वेळेसह ७०-७५ कि.मी. ची रेंज देते.

झेलिओ ई मोबिलिटी लिमिटेडचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक कुणाल आर्य म्हणाले, “लिटिल ग्रेसीच्या लाँचिंगसह, आम्ही असे उत्पादन सादर करण्यास उत्तेजित झालो आहोत, जे केवळ शैलीदार आणि क्रियात्मक नाही तर तरुण रायडर्ससाठी टिकाऊ वाहतूक देखील सुलभ करते. आमचे ध्येय हे, नेहमीच भारतातील दैनंदिन जीवनाचा एक भाग, इलेक्ट्रिक मोबिलिटी बनवणे हे राहिले आहे आणि लिटिल ग्रेसी ही, आम्हाला त्याकडे एक पाऊल जवळ घेऊन जाते. ही एक पर्यावरणपूरक, परवडणारी आणि परवान्याची गरज नसलेली स्कूटर आहे, जी आमच्या तरुण रायडर्सच्या विशिष्ट गरजा पूर्ण करते, त्याच वेळी नावीन्यपूर्णता आणि शाश्वततेसाठी आमची वचनबद्धता बळकट करते.”

प्रत्येक मॉडेल हे ४८/६०व्ही बीएलडीसी मोटरने सुसज्ज असून त्याचे वजन ८० किलो आहे, आणि त्याची लोडिंग क्षमता ८० किलो आहे. २५ कि.मी./तास कमाल वेग आणि प्रति चार्ज फक्त १.५ युनिट वीजेच्या वापरासह, लिटिल ग्रेसी ही,कमी अंतराच्या प्रवासासाठी एक कार्यक्षम आणि किफायतशीर असलेला उपाय आहे. या स्कूटरमध्ये डिजिटल मीटर, यूएसबी पोर्ट, चावीविरहित ड्राइव्ह, अँटी-थेफ्ट अलार्मसह सेंटर लॉक, रिव्हर्स गियर, पार्किंग स्विच आणि ऑटो-रिपेअर स्विच अशा आधुनिक सुविधा आहेत. यामध्ये हायड्रॉलिक सस्पेंशन, पुढील आणि मागील दोन्ही बाजूंना ड्रम ब्रेक्स देखील समाविष्ट आहेत आणि ते गुलाबी, तपकिरी/क्रीम, पांढरा/निळा आणि पिवळा/हिरवा या चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

लिटिल ग्रेसीमध्ये मोटर, कंट्रोलर आणि फ्रेमवर दोन वर्षांची वॉरंटी देखील आहे, ज्यामुळे ग्राहकांना इलेक्ट्रिक क्रांतीचा अंगीकार करताना मनःशांती मिळते.

तिच्या स्थापनेपासून, झेलिओ ई मोबिलिटी भारताच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारपेठेत लवकरच आघाडीवर आली आहे. २,००,००० हून अधिक समाधानी ग्राहक आणि देशभरात ४०० पेक्षा अधिक डीलरशिपच्या नेटवर्कसह, हा ब्रँड वेगाने आपला विस्तार करत आहे. २०२५ च्या अखेरीस १००० पेक्षा अधिक डीलरशिप करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे, जे देशभरातील ग्राहकांना पर्यावरणपूरक आणि परवडणाऱ्या मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदान करण्याच्या तिच्या वचनबद्धतेची पुन्हा एकदा पुष्टी करते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -