कमावण्याची क्षमता असलेल्या सक्षम महिलांनी पोटगी मागू नये

नवी दिल्ली:‘सक्षम महिलांनी पतीकडून पोटगी मागू नये, नोकरीचा योग्य अनुभव असलेली सुशिक्षित पत्नी फक्त पतीकडून पोटगी मिळवण्यासाठी बेरोजगार राहू शकत नाही’, असे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदविले आहे.दरम्यान, उच्च न्यायालयात अंतरिम पोटगी मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी एक याचिका दाखल करण्यात आली होती. पत्नीने दाखल केलेली ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

तसेच कमावण्याची क्षमता असलेल्या सक्षम महिलांनी पोटगी मागू नये, अशी महत्वाची टिप्पणी केली. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयावर स्पष्टीकारण देखील दिलं. कायदा आळशीपणाला प्रोत्साहन देत नाही आणि कमाईची क्षमता असलेल्या पात्र महिलांनी त्यांच्या पतींकडून अंतरिम पोटगीसाठी दावा देखील करू नये. कायद्याचे उद्दिष्ट हे समानतेचे असून आळशीपणाला प्रोत्साहन देणे नाही, असे स्पष्ट करत,विभक्त पतीकडून अंतरिम पोटगीसाठी महिलेची याचिका न्यायालयाने फेटाळली.
Comments
Add Comment

Devendra Fadnavis at Davos : महाराष्ट्राची दावोसमध्ये ऐतिहासिक भरारी; 'थर्ड मुंबई' प्रकल्पासाठी ११ जागतिक कंपन्यांसोबत सामंजस्य करार

दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत (WEF 2026) महाराष्ट्र सरकारने राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड

भारत - यूएई करारांवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचा भारताचा अल्पकालीन

शबरीमाला सोने चोरी प्रकरणात 'ईडी’कारवाई

तीन राज्यांमध्ये २१ ठिकाणी छापेमारी नवी दिल्ली : केरळमधील पवित्र सबरीमाला अय्यप्पा मंदिराशी संबंधित सोने चोरी

‘राष्ट्रगीता’वरून तामिळनाडूत हाय व्होल्टेज ड्रामा

राज्यपालांचा सभागृहातून सभात्याग नवी दिल्ली : तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन

युएईच्या अध्यक्षांच्या तीन तासांच्या भारत दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या दिल्ली दौऱ्याने भारत-यूएई संबंधांना

नदी पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्राचे मोठे पाऊल

देशातील पहिल्या राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचे मंत्री पंकजा मुंडे यांनी केले सादरीकरण नवी दिल्ली :