आयपीएल २०२५ वेळापत्रक बदलणार; एका सामन्यावर संकट

कोलकाता (वृत्तसंस्था): आयपीएल २०२५ चा पहिला सामना हा कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. मात्र कोलकाता नाईट रायडर्सला यंदाच्या इंडियन प्रिमिअर लीगमधील लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना घरच्या मैदानावर खेळता येणार नाही अशी दाट शक्यता आहे. यामुळे ६ एप्रिलला कोलकाताच्या ईडन होणाऱ्या केकेआर-लखनौ सामन्याच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आयपीएल २०२५ हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना बीसीसीआय सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा विचार करत आहे. ६ एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याचे वेळापत्रक बदलेल अशी शक्यता आहे. या बदलामागील प्रमुख कारण रामनवमीचा सण असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या दिवशी रामनवमीचा सण असल्याने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) ने बीसीसीआयला या सामन्याच्या वेळेत बदल करण्याची विनंती केली आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्सवाच्या दिवशी पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवणे कठीण होईल. त्यामुळे सामन्याचे वेळापत्रक बदलावे अशी मागणी करण्यात आली आहे.

पोलिसांबरोबर झाली विशेष बैठक

पश्चिम बंगालामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमधील राजकीय संघर्ष जगजाहीर आहे. भाजपाचे पश्चिम बंगालमधील नेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालमध्ये रामनवमीनिमित्त २० हजार मिरवणुका आयोजित केल्या जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. म्हणूनच बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्नेहशीश गांगुली यांनी कोलकाता पोलिसांबरोबर मंगळवारी दोन बैठका घेतल्या. या बैठकीनंतर पोलिसांनी अद्याप ६ तारखेच्या सामन्यासाठी परवानगी दिलेली नसल्याचं गांगुली यांनी स्पष्ट केलं. "आम्हाला या सामन्यासाठी पुरेशी सुरक्षा पुरवता येणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे. पोलिसांचं संरक्षण नसेल तर ६५ हजार प्रेक्षकांना हाताळणं कठीण होईल," असे गांगुली यांनी स्पष्ट केले आहे.
Comments
Add Comment

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही

मला चिंता नाही, सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा पूर्ण पाठिंबा!

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य

भारत-ऑस्ट्रेलिया महिला वर्ल्डकप उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल? वाचा नियम

मुंबई : महिला वनडे वर्ल्डकप २०२५ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, क्रिकेट चाहत्यांना उपांत्य फेरीतील रोमांचक

भारताला मोठा धक्का! प्रतीका रावल दुखापतीमुळे विश्वचषक उपांत्य फेरीतून बाहेर

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर प्रतीका रावल हिला झालेल्या दुखापतीमुळे ती

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिका, भारत-आफ्रिका आमनेसामने; दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर

मुंबई : ऑस्ट्रेलिया मालिकेचं आव्हान संपण्याआधीच टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेची तयारी करत