प्रहार    

मुंबईत दररोज तब्बल इतक्या लीटरची पाण्याची होते चोरी, आकडा ऐकून व्हाल हैराण

  69

मुंबईत दररोज तब्बल इतक्या लीटरची पाण्याची होते चोरी, आकडा ऐकून व्हाल हैराण

पाणीचोरी रोखण्यासाठी पाइपलाइनमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवणार


मुंबई (प्रतिनिधी): मुंबईत दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असून यातील ७०० दशलक्ष लिटर पाणीचोरी होते. ही पाणी चोरी रोखण्यासाठी पाइपलाइनमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यामुळे कंट्रोल रूममध्येच कळेल की पाणीचोरी, गळती कुठे होते, कोणी अतिरिक्त जोडणी केली आहे की नाही. ही यंत्रणा तयार करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला देण्यात येतील, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत सदस्य राजहंस सिंह यांनी मुंबईतील अपुरा पाणीपुरवठा आणि विविध भागांत होणारी पाणी चोरी थांबवावी, अशी मागणी लक्षवेधी मांडून केली. ते म्हणाले, मुंबईतील लोकसंख्या वाढत आहेत. त्यांना पाणीपुरवठा कसा करणार. त्यात कुर्ला, मानखुर्द, मालवणीमध्ये पालिका कर्मचाऱ्यांच्या संगनमताने पाणीचोरी होते.


मार्च महिन्यांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे यावर काष उपाययोजना करणार, असा सवाल सिंह यांनी केला. मुंबईत दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्येमुळे पाणीपुरवठा जास्त करावा लागणार आहे. त्यासाठी २०१३ साली गारगाई प्रकल्प विकसित करण्याला मुंबई महापालिकेने परवानगी दिले होते. दरम्यान, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी चार वर्षे लागणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईला अंदाजे ४४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबईतील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.


समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य करणारा पायलेट प्रकल्प मुंबई महापालिका राबवणार होती. त्यासाठी महापालिकेने ४०० कोटींची तरतूद केली आहे, त्यामुळे ४०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून मुंबईची पाणीटंचाई दूर करा, अशी मागणी अनिल परब यांनी केली. त्यावर हे अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ आंतरराष्ट्रीय निविदा काढण्यात येऊन प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला देण्यात येईल, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले.

Comments
Add Comment

रिअलमी पी 4 सिरीज २० ऑगस्टला भारतात होणार लाँच

मुंबई : रिअलमी कंपनी २० ऑगस्ट २०२५ रोजी भारतात आपली नवी रिअलमी P4 स्मार्टफोन सिरीज बाजारात आणत

राज्यात मुसळधार पावसाने सहा जणांचा बळी, पुण्यासाठी रेड अलर्ट

मुंबई : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने थैमान घातले असून विविध दुर्घटनांत सहा जणांचा मृत्यू झाल्याची

Chintamani First Look: 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची पहिली झलक समोर, संभाजी महाराजांच्या रूपातील प्रतिकृतीने वेधले लक्ष

मुंबई: मुंबईतील मानाच्या गणपतीमधील एक असलेला 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची पहिली झलक समोर आली आहे. आज सकाळी

विद्यापीठात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या, अवघ्या २९ दिवसांत दोन घटना

ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडातल्या शारदा विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आणि एका

मुंबईत कचरा उचलण्यासाठी आता ई-वाहन

वांद्रे ते सांताक्रूझमधील अरुंद गल्ल्यांमध्ये होणार वापर मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी वस्त्यांमधील अरुंद

संघाची दिल्लीत दोन दिवस बैठक

संलग्न संस्थांचे पदाधिकारीही उपस्थित राहणार मुंबई : अमेरिकेने अलीकडेच भारतावर ५० टक्के कर लावण्याची घोषणा केली