या कंपनीने लाँच केला खास प्लान, ७५० रूपयांत मिळणार ६ महिन्यांची सर्व्हिस

  77

मुंबई: BSNLच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स मिळतात. कंपनीने नुकताच एक नवा प्लान सादर केला आहे. हा परवडणारा रिचार्ज प्लान आहे. या प्लानमध्ये तुम्हाला कमी किंमतीत अधिक व्हॅलिडिटी आणि दुसऱ्या सर्व्हिस मिळतात. आम्ही बोलत आहोत BSNLच्या ७५० रूपयांच्या नव्या प्लानबद्दल...


हा प्लान ६ महिन्यांची व्हॅलिडिटी म्हणजेच १८० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यात तुम्हाला कॉलिंग, डेटा आणि एसएमएस तीनही फायदे मिळतात. ७५० रूपयांच्या बीएसएनएलच्या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला १८० दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यात तुम्हाला दररोज १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदे मिळतात.


सोबतच कंपनी तुम्हाला दररोज १०० एसएमएस देते. यात दुसऱ्या टेलिकॉम ऑपरेटरच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला असा प्लान मिळणार नाही. दरम्यान, BSNLचा हा प्लान सर्व युजर्ससाठी नाही. या प्लानचा फायदा केवळ GP-2 ग्राहकांना मिळणार आहे. आता सवाल असा आहे की हे ग्राहक कोण?


असे ग्राहक यांनी आपले कनेक्शन ७ दिवसांपेक्षा अधिक काळ रिचार्ज केलेले नाही त्यांना GP-2 ग्राहक म्हटले जाते. यासाठीची आणखी एक अट आहे ती म्हणजे ७ दिवसांपर्यंत रिचार्ज न केल्यानंतर १६५ दिवसांपर्यंत ते GP-2 ग्राहक बनतात. असे युजर्स ७५० रूपयांचा प्लान वापरू शकतात.


हा प्लान एक स्वस्त पर्याय आहे. यात तुम्हाला कमी किंमतीत दीर्घ व्हॅलिडिटीसोबत डेटा, कॉलिंग आणि एसएमएस तीनही फायदे मिळतात.

Comments
Add Comment

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

समुद्र किनाऱ्यांची कचऱ्यातून सुटका

मुसळधार पावसामुळे चौपाट्यांवर पसरलेला कचरा साफ मागील नऊ दिवसांमध्ये ९५० मेट्रीक टन कचऱ्याची लावली

सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश मुंबई : वरळी येथील सेंच्युरी

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.