आयपीएलची आजपासून ऑनलाईन तिकीटविक्री

  49

मुंबई :इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. आयपीएलचा हा १८ वा हंगाम असून त्यासाठी सर्व संघांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात खेळवला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वांनाच प्रतिक्षा असणारा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात चेन्नईतील एम चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) खेळवला जाणार आहे. दरम्यान, आता बऱ्याच ठिकाणच्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे. चेन्नईमध्ये जाऊन स्टेडियममधून ज्यांना या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी १९ मार्च २०२५ पासून ऑनलाईन तिकीट विक्रीला सुरुवात होणार आहे. १९ मार्च रोजी सकाळी १०.१५ वाजल्यापासून www.chennaisuperkings.com यावर तिकीट विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. याशिवाय चेन्नई सुपर किंग्सच्या वेबसाईटवर साईन अप करून त्यांच्या क्विज कॉन्टेस्टमध्ये जिंकून तिकीट मिळवण्याचीही संधी चाहत्यांना आहे. १७००, २५००, ३५००, ४००० आणि ७५०० अशा किंमतीची तिकीटे उपलब्ध असणार आहेत.
Comments
Add Comment

मुस्लिम असल्याने मला ट्रोल करतात : शमी

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अगामी आशिया चषकासाठी निवड न झाल्याबद्दल

पीव्ही सिंधू बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वार्टर फायनलमध्ये

पॅरिस : दुहेरी ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधूने बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वार्टर

बंगळुरु चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या तीन महिन्यानंतर आरसीबीची भावुक पोस्ट

नवी दिल्ली :  आयपीएल २०२५ चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अखेर सोशल मीडियावर परतले आहे. त्यांनी बंगळुरूमधील

R Ashwin IPL Retirement: आर. अश्विनने आयपीएलला दिला निरोप! म्हटले "प्रत्येक शेवट ही एक..."

चेन्नई: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या