Sitaram Ghandat : सहकार क्षेत्रातला मोठा चेहरा भाजपाच्या गटात!

  50

मुंबई : गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट (Sitaram Ghandat) यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते आ. बबनराव लोणीकर, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, रामप्रसाद बोर्डीकर, राहुल लोणीकर, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. चव्हाण यांनी सर्वांचे भाजपामध्ये स्वागत केले.



सीताराम घनदाट (Sitaram Ghandat) यांच्या बरोबर परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे अनेक माजी सदस्य, माजी नगराध्यक्ष, बाजार समिती सदस्य, नगरसेवक, सरपंचांसह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला. राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आ. बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रवेश झाले. यावेळी रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडणार याचा विश्वास वाटल्याने घनदाट यांच्यासह अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. अभ्यूदय बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात मोठं काम करणारे घनदाट यांच्या भाजपा प्रवेशामुळे परभणीमध्ये पक्ष संघटनेला बळ मिळणार आहे.


घनदाट यांच्यासोबत शरद पवार गटाचे परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रसाद बुधवंत, 'वंचित' आघाडीचे नेते सुरेश फड, अनंत देशमुख, सरपंच गजानन कांगणे, रमेश गिते यांच्यासह अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. परतूर (मंठा) नगराध्यक्ष वैजनाथ बोराडे, मंठा माजी नगराध्यक्ष नितीन राठोड, मंठा नगरसेवक विकास सूर्यवंशी यांच्यासह अन्य 10 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला.


भाजपामध्ये प्रवेश केलेल्या पालम तालुक्यातील पदाधिका-यांमध्ये परभणीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सदाशिवअप्पा ढेले, जयसिंगराव शिंदे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गोपीनाथराव तुडमे, नगरसेवक कैलास रुद्रवार, गौतम हत्तीआंबीरे, पंचायत समिती माजी सभापती आत्माराम सोडनर, सुभाषराव धुळगुंडे पेंडु, पेंडु खुर्दे सरपंच देवबा धुळगुंडे, पेंडु बु. सरपंच दत्तराव धुळगुंडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.



रत्नागिरी तालुक्यातील उबाठा शिवसेनेच्या पदाधिका-यांचा भाजपा प्रवेश


भाजपामध्ये प्रवेश केलेल्या रत्नागिरी तालुक्यातील उबाठा शिवसेनेच्या पदाधिका-यांमध्ये शिवसेना उप तालुका प्रमुख राकेश साळवी, कार्यालय प्रमुख संदीप सुर्वे, शाखाप्रमुख दीपक गावडे व दत्ता घडशी, उपविभाग प्रमुख (नाचणे) दिनेश रेमुलकर, सचिव दीपक सुकल यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.



छत्रपती संभाजीनगर येथील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांचाही प्रवेश 


छ. संभाजीनगर येथील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनीही याच कार्यक्रमात भाजपामध्ये प्रवेश केला. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली हे पक्षप्रवेश झाले. यावेळी आ. निरंजन डावखरे आणि जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर उपस्थित होते. भाजपामध्ये प्रवेश केलेल्या पदाधिका-यांमध्ये शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, विजय निकाळजे, शहर सचिव अंकुश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, मध्य विधानसभा अध्यक्ष फिरोज कुरेशी, अल्पसंख्याक विभाग शहर अध्यक्ष अस्लम शरीफ आदींचा समावेश आहे.

Comments
Add Comment

बस आणि रिक्षा-टॅक्सीनंतर आता कॅब प्रवास ही महागला..! ओला, उबेर, रॅपिडोच्या भाडेदरात दुप्पट वाढ

मुंबई: सध्या महागाई इतकी वाढत चालली आहे की, त्याचा फटका मध्यमवर्गीयांना पडत आहे. बस आणि रिक्षा-टॅक्सीनंतर आता कॅब

डोळ्यांना खिळवून ठेवणारा टीझर ... 'रामायणा'च्या रंजक गोष्टीची पहिली झलक...

काल 'रामायण: द इंट्रोडक्शन' हा सिनेमा नऊ शहरांमध्ये प्रदर्शित होणार अशी घोषणा झाली आणि सर्व प्रेक्षकांचा उत्साह

Insurance Awareness Committee Update: ‘सबसे पहले लाईफ इन्शुरन्स’ मोहिमेद्वारे विमा जागरूकता समिती संरक्षण-प्रथम आर्थिक नियोजनाला चालना

मुंबई: भारताला जीवन विमा संरक्षणातील एका महत्त्वपूर्ण तफावतीचा सामना करावा लागत आहे जो २०१९ मध्ये ८३% वरून २०२३

लिव्हरपूरलचा फुटबॉलपटू डिओगो जोटाचं कार अपघातात निधन

माद्रिद: पोर्तुगाल आणि लिव्हरपूलचा फुटबॉलपटू डिओगो जोटाचे वयाच्या २८ व्या वर्षी कार अपघातात निधन झाले आहे. जोटा

अरे बापरे! पुण्यात हे चाललंय तरी काय? घरात घुसून डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर बलात्कार!

पुणे: पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये

राशिचक्रकार शरद उपाध्याय यांचा निलेश साबळेंवर निशाणा.. म्हणतात 'गर्विष्ठ... '

झी मराठीवरील एक दशक एका कार्यक्रमाने गाजवलं आणि तो कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ द्या'च पाहिलं पर्व. या