Nitesh Rane : पाकिस्तानचा अब्बा आठवेल, अशी कारवाई होणार!

नागपूर हिंसाचाराबाबत नितेश राणे यांचा इशारा


मुंबई : नागपुरातील कालच्या हिंसाचाराच्या (Nagpur Riots) घटनेनंतर पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हिंसाचार प्रकरणी ८० जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे आज विधीमंडळात वादंग पेटलं असून या प्रकरणी कोणालाही सोडण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नागपूरच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.



नागपूरच्या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सभागृहात निवेदन केले आहे. त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे. सकाळी बजरंग दल, विहिंप आणि हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करत होत्या. दुपारी तो विषय मिटलेला. मग संध्याकाळी काही लोक आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आले आहेत. काहीही घडवणं या राज्यात सोप्पं राहिलेलं नाही, असे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.


त्याचबरोबर "या सगळ्या घटना बघितल्यावर हे सगळं पूर्वनियोजित होतं, असा वास येतोय. काही गोष्टी ठरवून केलेल्या होत्या. इथे दंगल घडवायचीच आहे, अशी काही लोकांची तयारी होती का? त्याबद्दल चौकशी होणार.पोलीस शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी होते, त्यांच्यावर हल्ला करण्याचं कारण काय? कुऱ्हाडीने हल्ला केला", असा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला. "हल्ला केल्यावर आम्ही सरकार म्हणून गप्प बसणार नाही. पाकिस्तानचा अब्बा आठवेल, अशी कारवाई आता होणार आहे. आंदोलनाचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण, हे आंदोलन कुठल्या प्रकारचं? ही हिंमत तोंडण्याचं काम आमचं देवाभाऊचं सरकार करेल", असा इशारा देखील नितेश राणे यांनी दिला.


Comments
Add Comment

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह