Eknath Shinde : संध्याकाळी ठरवून दंगल झाली ? एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला प्रश्न

मुंबई : नागपूरमध्ये सोमवारी संध्याकाळी चिटणीस पार्क आणि महाल भागात हिंसा आणि जाळपोळ झाली. विशिष्ट समाजाला लक्ष्य करुन हल्ले सुरू होते. पोलिसांवरही दंगलखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस जखमी झाले. जखमी पोलिसांवर उपचार सुरू आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले.



'आधी नागपूरमध्ये आंदोलन झाले. पोलीस आणि आंदोलक यांच्यात चर्चा झाली. आंदोलक शांततेने निघून गेले. नंतर संध्याकाळी आठ वाजता एक दुसराच गट रस्त्यावर आला. थोड्याच वेळात सुमारे पाच हजारांचा जमाव रस्त्यावर आला होता. महाल परिसर, मोमिनपुरा, हंसापुरी या भागात जमाव रस्त्यावर होता. मी टीव्हीवर महिलांच्या लहान मुलांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. घरामध्ये मोठे- मोठे दगड टाकले. पाच वर्षाचा बच्चू मरता मरता वाचला, हॉस्पिटलमध्ये असलेले देवांचे फोटो जाळले... तुम्ही आंदोलन करा पण लोकशाही पद्धतीने आंदोलन करा, कायदा हातात घेत विशिष्ट समुदयाला लक्ष्य करता... संध्याकाळी झालेल्या हल्ल्यामध्ये तीन डीसीपी जखमी झाले. एका डीसीपीवर कुऱ्हाडीने वार झाला. पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. कार आणि दुचाकी पेटवण्यात आल्या. एका विशिष्ट ठिकाणी रोज १०० ते १५० गाड्या पार्क व्हायच्या तिथे एकही गाडी नव्हती, अशी मला मिळालेली माहिती आहे. याचा अर्थ जाणीवपूर्व हे षडयंत्र करत विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यात आले आहे, असा संशय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना व्यक्त केला.



दंगल करणाऱ्यांनी पोलीस येईपर्यंत धुमाकूळ घातला. पोलीस आल्यावर त्यांच्यावरही हल्ला केला. पोलिसांवर दगडफेक केली. पेट्रोल बॉम्ब टाकले. महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारं सरकार आहे. या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलेला आहे त्यांच्यावर सरकार कडक कारवाई करेल, औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. दंगल करणाऱ्यांवर सरकार कायद्यानुसार कठोर कारवाई करेल, असेही त्यांनी सांगितले.
Comments
Add Comment

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील