Arjit Singh : गायक अरिजीत सिंहने गायलं मराठीतील लोकप्रिय गाणं

पुणे : अरिजीत सिंह (Arjit Singh) हा लोकप्रिय गायक आहे. त्याचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत. त्याची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. भारतीयांच्या मनात घर करुन असलेला हा गायक आवाजाची जादू पसरवत आहे. आता अरिजीत सिंहनं थेट मराठीतील "जीव रंगला..."हे लोकप्रिय गाणं गायलं आहे. अक्षरश: प्रेक्षकांना मराठी भाषिक वाटावा, या पद्धतीने त्याने हे गाणं गायलंय. अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


"जीव रंगला..." या गाण्याची अरिजीतलाही भुरळ पडली आहे. अरिजीत सिंह याने नुकतंच पुण्यात कॉन्सर्ट घेतला. यावेळी त्याने मराठीतील लोकप्रिय गाणं "जीव रंगला..." हे गायलं. अरिजीतच्या आवाजात "जीव रंगला..." हे गाणं ऐकून चाहते अक्षरश: ओरडायला लागले. रसिकांमधून एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. अस्खलित मराठीत अरिजीत "जीव रंगला..." गाणं गाताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.





मराठी गाणं आणि तेही अरिजितच्या आवाजात, हे डेडली कॉम्बिनेशन ऐकल्यानंतर मराठी प्रेक्षक तृप्त झालाय. "जीव रंगला..." हे गाणं 'जोगवा' या सुपरहिट मराठी चित्रपटालं आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हे गाणं प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि गायक हरिहरन यांनी गायलं आहे. या गाण्याची निर्मिती अजय-अतुल यांनी केली होती.



अरिजीतबद्दल बोलायचं झालं तर एका गाण्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावतो. पण, खऱ्या आयुष्यात मात्र त्याला साधं राहायला आवडतं. त्याचं साधं राहणीमान चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतं. चाहते नेहमीच त्याच्या आवाजाची प्रतीक्षा करत असतात. चाहते त्याला 'किंग ऑफ प्लेबॅग सिंगिंग' असं म्हणतात.

Comments
Add Comment

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची

सलमान खानच्या हस्ते मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर

‘रुबाब’चा टीझर प्रदर्शित

झी स्टुडिओजच्या ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, पहिलीच झलक आणि ‘तुझ्यासारखी

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ ३० जानेवारीपासून चित्रपटगृहात

नाताळच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त हास्याची भेट समोर आली आहे! प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.