Adani Electricity : अदानी इलेक्ट्रिसिटीला अमेरिकेत गोल्ड एचआर एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड

मुंबई : अदानी इलेक्ट्रिसिटीला (Adani Electricity) अमेरिकेतील ब्रॅंडन हॉल एच आर एक्सलन्स गोल्ड अ‍ॅवॉर्ड २०२४ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याने त्यांना जागतिक मान्यता मिळाल्याचे सांगितले जात आहे. कंपनीला त्यांच्या प्रमुख अदाणी मार्व्हल्स (ए मार्व्हल्स) लीडरशिप उपक्रमासाठी बेस्ट लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम गटात हा पुरस्कार मिळाला. त्यायोगे कर्मचाऱ्यांचा सतत विकास करण्याच्या आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या कंपनीच्या निर्धाराला मान्यता मिळाल्याचे दाखवून दिले जात आहे. संस्थेच्या दीर्घकालीन वाढीसाठी एक वर्षाचा 'ए मार्व्हल्स' हा कार्यक्रम तयार करण्यात आला असून त्याद्वारे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये पुढील काळातील नेतृत्वगुणांसाठी कौशल्य आणि दूरदृष्टी विकसित केले जातात.



अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये झालेल्या ब्रॅंडन हॉल एक्सलन्स कॉन्फरन्स दरम्यान अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि. चे मुख्य मनुष्यबळ संसाधन अधिकारी डॉ. संजीव मुरमकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. आमच्या कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणावर आम्ही देत असलेला भर, या पुरस्काराद्वारे अधोरेखित झाला आहे, असे ते म्हणाले. हा पुरस्कार मिळाल्याने मनुष्यबळाच्या भांडवलाचा विकास करण्यातील व संस्थात्मक विकास आणि व्यवस्थापन कौशल्यात नवे मापदंड निर्माण करण्यातील अदानी इलेक्ट्रिसिटीच्या (Adani Electricity) क्षमतेवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.

Comments
Add Comment

Ashish Shelar : मुंबईतील शाळांच्या भौतिक सुविधा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरा; पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे निर्देश

तपासणी अधिकाऱ्यांची 89 पदे रिक्त https://prahaar.in/2026/08/24/why-are-jihadis-who-throw-eggs-at-the-ganesh-procession-even-needed-in-maharashtra-minister-nitesh-rane-asks-angrily/ मुंबई : मुंबई महापालिका

Pune MHADA Lottery 2026 : पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी; म्हाडाकडून ४,४६२ घरांसाठी सोडत जाहीर

पुणे : पुणे आणि आसपासच्या परिसरात स्वतःचे घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाच्या पुणे मंडळाने एक अत्यंत

CM Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा; पहिल्याच करारातून, ८९.६० लाखांची मदत

मुंबई : यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री

Vikroli Women Suicide : विक्रोळीत वृध्द महिलेचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 65 वर्षीय

Vile Parle Crime : मुंबईतील संतापजनक घटना! द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या शिक्षकाने 16 वर्षीय विद्यार्थींनीला बोलावून घेतलं अन्...

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित 48 वर्षीय जिम्नॅस्टिक्स

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.