मुंबई : अदानी इलेक्ट्रिसिटीला (Adani Electricity) अमेरिकेतील ब्रॅंडन हॉल एच आर एक्सलन्स गोल्ड अॅवॉर्ड २०२४ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याने त्यांना जागतिक मान्यता मिळाल्याचे सांगितले जात आहे. कंपनीला त्यांच्या प्रमुख अदाणी मार्व्हल्स (ए मार्व्हल्स) लीडरशिप उपक्रमासाठी बेस्ट लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम गटात हा पुरस्कार मिळाला. त्यायोगे कर्मचाऱ्यांचा सतत विकास करण्याच्या आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या कंपनीच्या निर्धाराला मान्यता मिळाल्याचे दाखवून दिले जात आहे. संस्थेच्या दीर्घकालीन वाढीसाठी एक वर्षाचा ‘ए मार्व्हल्स’ हा कार्यक्रम तयार करण्यात आला असून त्याद्वारे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये पुढील काळातील नेतृत्वगुणांसाठी कौशल्य आणि दूरदृष्टी विकसित केले जातात.
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये झालेल्या ब्रॅंडन हॉल एक्सलन्स कॉन्फरन्स दरम्यान अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि. चे मुख्य मनुष्यबळ संसाधन अधिकारी डॉ. संजीव मुरमकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. आमच्या कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणावर आम्ही देत असलेला भर, या पुरस्काराद्वारे अधोरेखित झाला आहे, असे ते म्हणाले. हा पुरस्कार मिळाल्याने मनुष्यबळाच्या भांडवलाचा विकास करण्यातील व संस्थात्मक विकास आणि व्यवस्थापन कौशल्यात नवे मापदंड निर्माण करण्यातील अदानी इलेक्ट्रिसिटीच्या (Adani Electricity) क्षमतेवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.