वरळी-शिवडी कनेक्टरचे काम रखडले

वाहतूक विभागाच्या परवानगी अभावी विलंब


मुंबई (प्रतिनिधी): मुंबईच्या वाढीला आणखी गती देणारा वरळी-शिवडी कनेक्टर प्रकल्प पुन्हा रखडताना दिसत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्यात खुला करण्याचा दावा राज्य सरकारने केला असला तरी प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पुलाने या कनेक्टरचा मार्ग अडवला आहे. वाहतूक पोलिसांकडून एमएमआरडीएची परवानगी न मिळाल्याने हा पूल पाडण्याची प्रक्रिया रखडली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) प्रभादेवी आरओबी पूल पाडून नवीन डबल डेकर पूल बांधणार आहे. फेब्रुवारी महिन्यातच हा पूल पाडण्यात येणार होता. दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्थेसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. हा पूल पाडण्यासाठी वाहतूक बदलणे आवश्यक आहे, मात्र एमएमआरडीएला अद्याप वाहतूक पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे पुलाच्या कामाला विलंब होत आहे.


एमएमआरडीए वाहतूक पोलिसांच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे बरळी-शिवडी उन्नत रस्त्याचे कामही रखडले आहे. कारण या पुलावरून एलिव्हेटेड रस्ता जाणार आहे. नुकताच अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरळी-शिवडी उन्नत रस्त्याचे काम मार्च २०२६ मध्ये पूर्ण होईल, असा दावा केला आहे. हा उन्नत रस्ता वरळी ते शिवडी मार्गे अटल सेतूला जोडेल. याशिवाय वांद्र-वरळी सी-लिंकलाही कनेक्टिव्हिटी मिळेल. त्याच्या बांधकामानंतर नरिमन पॉइंट आणि उपनगरांकडे जाणे सोपे होईल. अंदाजे १२५ वर्षे जुना प्रभादेवी पुल धोकादायक बनला असून तो पाडून त्या जागी नवीन पूल बांधण्याची गरज आहे. वरळी-शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पांतर्गत हा पूल पाडून त्या जागी नवीन डबलडेकर पूल बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. हा डबलडेकर पूल १३२ मीटर लांब आणि २७ मीटर उंच असेल. नवीन डबलडेकर पूल बांधल्यानंतर वरळी शिवडी उन्नत रस्ता दुसऱ्या स्तरावरून अटल सेतुकडे जाईल.


स्थानिक वाहतुकीसाठी पुलाच्या पहिल्या मजल्यावर दोन्ही टोकांना प्रवेश रस्ते असतील आणि १५६ मीटर लांबीचा कनेक्टिंग रोड परळच्या दिशेने नाईल, तर २०९ मीटर लांबीचा कनेक्टिंग रोड वरळीच्या दिशेने जाईल. या डबल डेकर पुलाच्या बांधकामासाठी अंदाजे १६८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एमएमआरडीएने फेब्रुवारी महिन्यात हा पूल पाडण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र १० वी आणि १२ वीच्या परीक्षेचे कारण देत काही मुदतवाढ मागितली. दहावी आणि बारावीच्या परीक्षा लवकरच संपणार आहेत, परंतु एमएमआरडीएकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. पावसाळ्यापूर्वी पूल पाडण्याचे काम पूर्ण करून उर्वरित काम सुरू करणे आवश्यक असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लवकरात लवकर पूल पाडण्याची परवानगी मिळावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. दरम्यान, प्रभादेवी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करणे आणि पाडण्यास परवानगी देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे वाहतूक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.


एकूणच हा पूल पाडण्यास विलंब होण्याची चिन्हे आहेत. वरळी, परळ, शिवडी यांना जोडणाऱ्या शिवडी-वरळी कनेक्टरच्या उन्नत रस्त्याचे ६५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. काही तांत्रिक आणि पुनर्वसन समस्या त्वरीत सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते वाहतुकीचे चित्र तर बदलेलच शिवाय मुंबईचा वेगही वाढणार आहे. ती मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू आणि वरळी सी फेसला नोडेल. या कनेक्टरमुळे मुंबई आणि रायगड दरम्यान कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होणार आहे. या प्रकल्पामुळे केईएम, वाडिया, टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. २५ ते ३० मिनिटांत परळ टीटीहून रायगडला थेट पोहोचता येते. त्यामुळे दोन ते अडीच तास अधिक इंधनाची बचत होणार आहे. या कनेक्टरमुळे नवी मुंबई ते मध्य आणि दक्षिण मुंबईला जाणाऱ्यांची वेळेची बचत करणाऱ्या मार्गाचा लाभ मिळणार आहे. अटल सेतूला जोडल्याने रापगड मार्ग कोकण, गोवा, दक्षिण भारताकडे जाणाऱ्या लोकांसाठी रस्त्याने प्रवास करणे सोपे होईल. या प्रकल्पामध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर दोन आरओबी बांधण्याचा समावेश आहे. प्रकल्पाच्या बांधकामात पुनर्वसनाचे प्रश्न आहेत. या व्यतिरिक्त, आरओबी बांधकामामध्ये अभियांत्रिकी आव्हाने आहेत. प्रकल्पात शिवडी बस डेपोजवळील १०० झोपड्यांच्या पुनर्वसनाचे प्रकरण गुंतागुंतीचे आहे. याशिवाय सेना नगर, हनुमान नगर, एकात्मा फुले नगर या भागातील रहिवाशांच्या पुनर्वसनाची अडचण आहे.

Comments
Add Comment

Mumbai Local News : मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; 'थर्टी फर्स्ट'साठी मात्र रेल्वेकडून खूशखबर

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वेच्या रूळांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी येत्या रविवार, २८

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी