पाकिस्तानविरोधात लढाईत निर्वासित बलुचिस्तानने मागितली भारताकडे मदत

बलूच : बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानवर आक्रमक हल्ले सुरूच ठेवले आहेत. ट्रेन हायजॅकपासून स्फोटापर्यंत बलूचिस्ताननं पाकिस्तानची डोकेदुखी वाढवली आहे. त्यातच दीर्घ काळापासून बलूचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारी नायला कादरी बलोच यांनी पाकिस्तानला फटकारले आहे. बलूचिस्तान हा कधीकाळी स्वतंत्र देश होता, त्यावर आता पाकिस्तानचा अवैध कब्जा आहे असा बलुचच्या स्वयघोषित पंतप्रधान डॉ. नायला कादरी बलोच दावा करत बलोच लोकांविरोधात मानवाधिकार उल्लंघन, संसाधनाची लूट आणि हत्येचा आरोप पाकिस्तान सरकारवर केला आहे.



स्वतंत्र बलूचिस्तानचं स्वप्न साकार करण्यासाठी डॉ. नायला कादरी बलोच यांनी निर्वासित बलोच सरकारची स्थापना केली आहे. त्या स्वत: बलोच सरकारच्या पंतप्रधान आहेत, ज्याची स्थापना २१ मार्च २०२२ रोजी युरोपात केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे ठिकाण सार्वजनिक केले नाही. त्या सध्या कॅनडात राहत असल्याचं सांगितले जाते. नायला बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यसाठी आंतरराष्ट्रीय समर्थन मिळावे यासाठी अनेक देशांचा दौरा करतात.त्यांनी विशेषत: भारताकडे मदतीचे आवाहन केले आहे.भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात बलुचिस्तानचा मुद्दा उचलून धरण्याची मागणी त्यांनी केली आहे.



नायला यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकार यांच्याकडे यूएनमध्ये बलूचिस्तानच्या समर्थनात उभे राहण्याची संधी आहे.जी कदाचित उद्या नसेल. नरेंद्र मोदींना बलुचिस्तानातील लोक नायक म्हणून पाहतात.जर भारताने युएनमध्ये बलूचिस्तानचे समर्थन केले तर स्वतंत्र बलूचिस्तान भविष्यात भारताचं समर्थन करेल. भारत आणि बलूचिस्तान यांच्यात खूप साम्य आहे. या दोन्ही देशांना धर्माच्या नावावर अन्याय केला गेला असंही त्यांनी सांगितले. परंतु भारत सरकारने अद्याप बलूचिस्तान निर्वासित सरकारला मान्यता दिली नाही.

दरम्यान, नायला या सातत्याने भारत दौरा करतात. २०१६ मध्ये त्या भारतात आल्या होत्या. हे तेच वर्ष होते जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलूचिस्तानचा मुद्दा १५ ऑगस्टच्या त्यांच्या लाल किल्ल्यावरील भाषणात उचलला होता. त्यानंतर २०२३ आणि २०२४ मध्येही नायला भारतात आल्या होत्या. बलूचिस्तानमध्ये खूप वाईट परिस्थिती आहे. पाकिस्तानी सैन्य बलूच लोकांच्या घराला आग लावत आहे. आमच्या बागा, शेती पेटवत आहे असं नायला यांनी भारतात आल्यावर म्हटलं होते.
Comments
Add Comment

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

थायलंड  : बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान

मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दुबई  : दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो

‘मांजरांचे बेट’ अशी ओळख असलेलं अनोखं ठिकाणं

टोकियो  : जगात अनेक रहस्यमय आणि अनोखी ठिकाणे आहेत; पण जपानमधील एका बेटाने आपल्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांना

भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक अनुभवाची संधी! युनेस्कोचा इंटर्नशिप प्रोग्राम, आताच करा अर्ज

भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. युनेस्कोने

भारतानंतर आता अफगाणिस्तान पाकिस्तानचे पाणी अडवणार!

काबूल : भारतानंतर आता तालिबानशासित अफगाणिस्तान पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा मर्यादित करण्याची आणि नदीवर धरणे

रशियातील महत्त्वाच्या दोन तेल कंपन्यांवर ट्रम्पचे निर्बंध, रशियावर येणार आर्थिक दबाव! भारतालाही बसणार का फटका?

अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर आर्थिक दबाव आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.