Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १६ ते २२ मार्च २०२५

Share

साप्ताहिक राशिभविष्य, १६ ते २२ मार्च २०२५

इच्छा पूर्ण होतील

मेष : मागील काही काळ जाणवणारी आर्थिक ओढाताण संपुष्टात येईल. पैशाअभावी रखडलेली कार्य मार्गी लागतील. नोकरीत-व्यवसायात आर्थिक फायदा चांगला होऊन बरेच दिवस मनात घोळत असलेली एखादी इच्छा पूर्ण होईल. नोकरीत वेतनवृद्धी, पदोन्नती संभवते. कामाच्या स्वरूपातील बदलाचे व नवीन जबाबदाऱ्यांचे स्वागत करा. नवीन आव्हाने स्वीकारा. त्यामुळे कर्तृत्वास नवीन झळाळी मिळेल. पूर्वी केलेल्या कामाचे फळ मिळेल. कौतुकास पात्र ठराल. आत्मविश्वासात भर पडून पुढील कार्य करण्यासाठी कार्यमग्न राहा. जुन्या गुंतवणुका भरघोस आर्थिक फायदा करून देतील. नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेणे हिताचे ठरेल.

महत्त्वाची कार्य पूर्ण करू शकाल

वृषभ : व्यवसाय-धंद्यावर सरकारी धोरणांचा सम-विषम परिणाम होण्याची शक्यता. नोकरीत सहकारी, वरिष्ठांबरोबर मत-मतांतरे होऊ शकतात. वादविवाद घडू नये यासाठी विविध प्रयत्न करावे लागतील. कुटुंबातील सदस्यांच्या मतास उचित प्राधान्य द्या. एकूण सर्वच क्षेत्रांतील कार्य हातावेगळी करू शकाल. नोकरी – व्यवसायात कायदेशीर बाबी सांभाळल्या पाहिजेत. महत्त्वाची कार्य पूर्ण करू शकाल. जमीन-जुमला, स्थावर मिळकत याविषयीचे थांबलेले अथवा रखडलेले व्यवहार गतीमान होतील. वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधी असलेले वाद-विवाद संपुष्टात येतील. घरातील मौल्यवान वस्तूंकडे लक्ष ठेवा. चोरीची शक्यता अथवा नुकसानीचे भय. परदेशगमनाची शक्यता.

आश्चर्य वाटेल

मिथुन : अनुकूल ग्रहमान लाभल्यामुळे उत्साही व आनंदी राहाल. थोड्या प्रयत्नांनी हातात घेतलेली कार्य पूर्ण होण्याचा अनुभव घेताना आश्चर्य वाटेल. कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होतील. काहींचे परिचयोत्तर विवाह होतील. व्यावसायिक नवे करारमदार होऊ शकतात. विशेषतः परदेशी व्यापार वृद्धी योग, त्याचप्रमाणे परदेशगमनाचे योग, कुटुंबातील मुला-मुलींकडून त्यांच्या विद्याअभ्यासातील प्रगतीच्या बातम्या मिळाल्यामुळे आनंदी राहाल. नवपरिणीतांना अपत्य योग, कुटुंब वृद्धी, व्यवसायामध्ये प्रतिष्ठा वाढेल. कलाकार व साहित्य क्षेत्रातील जातकांना यश व प्रसिद्धी मिळेल. स्पर्धकांवर मात करू शकाल. 

प्रयत्न चालू ठेवणे गरजेचे

कर्क : सध्याच्या कालावधीमध्ये अति महत्त्वाकांशा न बाळगता वाटचाल करणे फायदेशीर ठरणार आहे. तडजोड फायद्याची ठरेल. कुटुंब परिवारामध्ये अथवा मित्रमंडळींच्या वर्तुळात छोट्या-छोट्या कारणांवरून वादविवादाची शक्यता. नाती दुरावण्याची शक्यता. वादविवाद टाळून त्यांना महत्त्व देणे फायद्याचे ठरेल. नोकरीत अनपेक्षित घटनांना सामोरे जावे लागण्याची शक्यता. स्वतःच्या बोलण्यावर तसेच वर्तणुकीवर नियंत्रण आवश्यक. कोर्ट प्रकरणातून मनस्ताप उद्भवू शकतो. आपले प्रयत्न चालू ठेवणे गरजेचे राहील. भांडण टाळा. व्यवसाय-धंद्यात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल.

नियोजन सफल होईल

सिंह : विशेषतः तरुण-तरुणींना भरघोस फळे मिळतील. आपले शिक्षण पूर्ण करून जे जातक नोकरीच्या शोधार्थ असतील अशा जातकांचा नोकरीविषयक शोध संपुष्टात येऊ शकतो. चालू नोकरीतही चांगली फळे मिळतील. पदोन्नती, वेतनवृद्धीसारख्या घटना घटित होतील. मात्र बदलीची शक्यता. व्यावसायिक आघाडीवर ती संपादित करा. व्यावसायिक परिस्थिती सुधारेल. कर्जातून मुक्तता. व्यवसायातील नियोजन सफल होईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाण्याची संधी शिष्यवृत्तीसह मिळू शकते.

शुभ घटना घडतील

कन्या : आपण पूर्वी केलेल्या कार्याचा गौरव होऊन आपणास त्याची बक्षिसी मिळेल. व्यक्तिगत फायदा होऊन मानसन्मानास पात्र ठराल. नोकरीत अचानक एखादी चांगली घटना आपला उत्साह वाढवेल. तसेच कुटुंब परिवारात शुभ घटना घडतील. आत्मविश्वासाने पुढील कार्य पार पाडाल. आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांवर पडेल. आपल्या वागण्याने अथवा बोलण्याने इतरांना दुखवू नका. नात्यांना जपा. कलाकार, खेळाडूंना सरकार दरबारी मान मिळू शकतो. शुभवार्ता मिळतील.

प्रवास घडतील

तूळ : सुरुवातीला खर्चात वाढ झाल्यासारखे वाटेल. त्यात काही अनपेक्षित खर्च ही समाविष्ट असण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या वाढू शकतात. तसेच मुला-मुलींसाठी खर्च संभवतो. त्यांच्या शैक्षणिक बाबी खर्ची ठरतील. राहत्या घरातील सुखसुविधा वाढविण्याकरता खर्च करावा लागेल. वाहनाच्या देखभालीवर खर्च करावा लागेल. आपला आर्थिक स्त्रोतही वाढेल. व्यवसायातील जुनी येणी वसूल होतील. उधारी उसनवारी वसूल होईल. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींच्या बाबत समस्या उद्भवू शकतात. प्रवास घडतील. मतभेदाची शक्यता.

मदत मिळू शकते

वृश्चिक : शुभग्रहांचे पाठबळ लाभल्यामुळे आर्थिक आलेख उंचावलेला अनुभवाल. नोकरी-व्यवसायातील जुनी येणी वसूल होतील. नेहमीच्या उत्पन्नांच्या मार्गाव्यतिरिक्त इतर मार्गांनी उत्पन्नात भर पडू शकते. सरकारी क्षेत्रातून मदत मिळू शकते. सरकारी अनुदानातून लाभ मिळू शकतो. सरकारदरबारी जर एखादे प्रकरण प्रविष्ट असेल तर त्या प्रकरणी यश मिळेल. तसेच आर्थिक सहाय्य मिळू शकते. व्यावसायिक कर्ज मंजूर होतील. वाहने चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील.

वादविवाद टाळा

धनू : काही प्रमाणात कडू तसेच गोड फळे चाखण्यास मिळतील. तरुण-तरुणींचा भाग्योदय. नोकरीविषयक प्रश्न संपुष्टात येतील. प्रयत्न विशेष सफल होतील. कुटुंबात अथवा बाहेरील क्षेत्रात वादविवाद टाळा. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. कुटुंब परिवारातील विवाहयोग्य, तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होतील. व्यावसायिक वादग्रस्त येणी आल्यामुळे आश्चर्य वाटेल. विवाह जमतील. सरकार दरबारची प्रलंबित अवस्थेतील कार्य गतिमान होऊन पूर्णत्वाकडे झुकते. शांतपणे निर्णयघ्या.

उद्योग-व्यवसायात यश मिळेल

मकर : जवळच्या व्यक्ती मातृत्वाच्या भावनेने आपल्याशी वागण्याची शक्यता आहे. समज-गैरसमज होण्याची शक्यता. संबंधित स्त्रियांशी सौजन्यपूर्ण वागणूक आवश्यक आहे. प्रतिष्ठेविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृती जपा. कोणाच्या आजारपणाचा अथवा शस्त्रक्रियेचे योग आहेत. मानसिक व शारीरिक त्रासाची शक्यता. उत्तरार्धात काहीसे प्रतिकूल वाटणारे ग्रहमान बदलेल. उद्योग-व्यवसायात यश मिळेल परंतु आळसाला दूर सारणे हितकारक ठरेल.व्यवसायातील तसेच नोकरीत धंद्यातील परिस्थितीमध्ये फारसा बदल अपेक्षित नाही. व्यवसायानिमित्त प्रवास घडतील.

मानसन्मान मिळेल

कुंभ : अनुकूल परिस्थिती असली तरी सध्याच्या परिस्थितीचे शांतपणे अवलोकन करून मगच निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक आवक जरी येत राहिली तरी खर्चाचे प्रमाण आणि वाढलेले अनुभवास येऊ शकेल. कुटुंब परिवारासाठी काही खर्च अपरिहार्य, तर काही खर्च अचानक समोर उभे राहिल्यामुळे त्याची पूर्तता करावी लागेल. व्यवसायातील उलाढाल वाढलेली दिसून येईल.धनलाभाचे योग, आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगली पाहिजे. कलाकारांना अनुकूल कालावधी केलेल्या कामाचा गौरव होऊन मानसन्मान मिळेल. नोकरीमध्ये आपल्या कामाचे कौतुक होईल. खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याच्या संधी.

व्यवसायात अधिक लाभ संभवतात

मीन : व्यवसायात अधिक लाभ संभवतात. व्यवसायिक परिस्थिती समाधानकारक राहून उलाढालीमध्ये वृद्धी होईल. जुन्या सहकार्यांबरोबर व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होईल. भागीदारी व्यवसायात भागीदाराच्या बरोबर वाद-विवाद, मतभेद नको. कुटुंब परिवारामध्ये विरोध वाढू शकतो. राजकारणात सक्रिय असलेल्या जातकांनी अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे. आश्चर्यकारकरीत्या जवळचे लोक शत्रुत्वाने वागू शकतात. येथे शत्रूंच्या कारवायांकडे नीट लक्ष ठेवणे क्रमप्राप्त ठरेल. विरोधकांच्या विरोधाला नवी धार चढल्याची जाणीव होईल. सावधगिरी बाळगावी.

Recent Posts

लिंबू लोणचं

पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…

18 minutes ago

पुण्यात काँग्रेसला गळती, नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या वाटेवर

पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…

29 minutes ago

भाषा हे राजकारण्यांच्या हातातले हत्यार नाही!

डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…

31 minutes ago

आदिवासी जमातीसाठी ती ठरली आरोग्यदूत

अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…

37 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २० एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…

48 minutes ago

PBKS vs RCB, IPL 2025: घरच्या मैदानावर पंजाब पुन्हा एकदा बेंगळुरूला भिडणार

मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे…

1 hour ago