Abu Qatal killed : हाफिझ सईदचा विश्वासू सहकारी अबू कताल अज्ञातांच्या हल्ल्यात ठार

  91

इस्लामाबाद : लष्कर - ए - तोयबा या अतिरेकी संघटनेचा सदस्य आणि हाफिझ सईदचा विश्वासू अबू कताल (४३) उर्फ झिया-उर-रेहमान याची शनिवारी रात्री पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी हत्या केली. अबू कताल संध्याकाळी सातच्या सुमारास झेलम परिसरात सुरक्षा रक्षकासोबत शतपावली करत होता. त्यावेळी अज्ञातांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी १५ - २० गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात अबू कताल आणि त्याचा एक सुरक्षा रक्षक हे दोघे घटनास्थळीच ठार झाले. आणखी एक सुरक्षा रक्षक जखमी झाला आहे. जखमी सुरक्षा रक्षकावर उपचार सुरू आहेत.



अबू कतालला पाकिस्तानकडून संरक्षण देण्यात आले होते. पाकिस्तानच्या लष्कराचे निवडक जवान आणि लष्कर - ए - तोयबा या अतिरेकी संघटनेचे सदस्य अबू कतालचे संरक्षण करत होते होते. एवढे संरक्षण असूनही अबू कतालची हत्या झाली. झेलम परिसरातील दिना पंजाब विद्यापीठाजवळील झीनत हॉटेलजवळ अबू कतालच्या दिशेने गोळीबार करण्यात आला.



हाफिझने अबू कतालला स्वतःच्या संघटनेत चीफ ऑपरेशनल कमांडर या पदावर नियुक्त केले होते. तर एनआयएने २०२३ च्या राजौरीतील स्फोटात अबू कतालचाच हात असल्याचे त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

राजौरीतील धांगरी गावात १ जानेवारी २०२३ रोजी अतिरेकी हल्ला झाला होता. या हल्ल्यात दोन मुलांसह एकूण सात जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर २० एप्रिल २०२३ रोजी भट्टा / दुरिया येथे पाच भारतीय जवानांना अतिरेक्यांनी ठार केले होते.

अबू कताल हा फक्त लष्कर - ए - तोयबासाठीच नाही तर इतर अतिरेकी संघटनांसाठीही मार्गदर्शक म्हणून पाकिस्तानमध्ये कार्यरत होता.
Comments
Add Comment

येमेनजवळ मोठी दुर्घटना, आफ्रिकन स्थलांतरितांची बोट बुडाली, ६० हून अधिक जणांचा मृत्यू

सना, येमेन: येमेनच्या किनाऱ्यावर रविवारी एक भीषण बोट दुर्घटना घडली, ज्यात ६० हून अधिक आफ्रिकन स्थलांतरितांचा

भूकंपानंतर आता रशियात ज्वालामुखीचा उद्रेक! राखेचे लोट ६,००० मीटर उंचीपर्यंत

मॉस्को: रशियाच्या कामचटका प्रांतातील Petropavlovsk येथे ८.८ तिव्रतेचा भीषण भूकंप झाल्यानंतर आता याच ठिकाणी ज्वालामुखीचा

पाकिस्तानात ५.१ रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये रविवारी (३ ऑगस्ट) भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. पाकिस्तानच्या नॅशनल

'भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही...' डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आता रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबवू शकतो,

२५% ट्रम्प टॅरिफचा धोका टळला! एक आठवड्यासाठी दिलासा

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर २५ टक्के टॅरिफची घोषणा केली होती, जी १

ट्रम्प यांनी ४१ टक्क्यांपर्यंत लावला टॅरिफ, आदेशावर केली स्वाक्षरी, भारतासह ७० देशांवर होणार परिणाम

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेताना यांनी अनेक देशांच्या वस्तूंवर १० ते ४१