काव्यरंग : राधे, रंग तुझा गोरा

राधे, रंग तुझा गोरा सांग कशाने रापला?
सावळ्याच्या मिठीमध्ये रंग सावळा लागला?

राधे, कुंतल रेशमी... सैरभैर गं कशाने?
उधळले माधवाने किंवा नुसत्या वाऱ्याने?

राधे, नुरले कशाने तुज वस्त्रांचेही भान?
निळा प्रणय अथवा एका बेभानाचे ध्यान?

राधे, कासाविशी अशी... तरी ‘‘वेडी” कशी म्हणू?
तुझ्या रूपाने पाहिली एक वेडीपिशी वेणू!
राधे, दृष्टीतून का गं घन सावळा थिजला?
इथे तुझ्या डोळा पाणी… तिथे मुरारी भिजला!!

डोळा पाणी... जिणे उन्ह... इंद्रधनूचा सोहळा
पुसटले साती रंग…एक ‘‘श्रीरंग” उरला!!

– संदीप खरे

वाटा वाटा


वाटा वाटा वाटा गं
चालीनं तितक्या वाटा गं

माथी छाया, पायी ऊन
प्रवास माझा उफराटा गं

रानफुलांहून फुलने माझे...
हट्टी गं... सहा ऋतुंशी जन्माने मी... कट्टी गं
मैत्रीण माझी मीच मला... अप्रूप माझे
आनंदी मी आनंदाची युक्ती गं

दर्या दर्या दर्या गं
उरात शंभर लाटा गं
लख लख मोती माझ्या आत
कसा मी वेचू आता गं

स्वर - प्रियांका बर्वे
गीत - वैभव जोशी
Comments
Add Comment

समुद्राच्या गाभ्यातील अदृश्य विष

पर्यावरण - मिलिंद बेंडाळे समुद्राचे वाढते तापमान, आम्लीकरण, प्लास्टिक प्रदूषण आणि अतिमासेमारी यामुळे सागरी

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची पाच वर्षे आणि महिलांचे संपलेले स्वातंत्र्य

आंतरराष्ट्रीय - आरिफ शेख तालिबानला सत्ता मिळवता आली; पण महिलांचे स्वातंत्र्य हिरावून घेऊन आधुनिक राष्ट्र उभे

मनाच्या आरपार

स्मृतीगंध - लता गुठे मन हा अवघ्या दोन अक्षरांचा शब्द! पण या दोन अक्षरांत माणसाचं संपूर्ण जग सामावलेलं आहे. मन हे

‘जिंदगी देनेवाले सुन…’

नॉस्टॅल्जिया - श्रीनिवास बेलसरे कधी कधी माणूस अगदी निराश होतो. जगण्यात काही अर्थ नाही असे त्याला वाटू लागते.

आधी बीज एकले...

संवाद - गुरुनाथ तेंडुलकर ही गोष्ट तुम्ही कदाचित पूर्वी ऐकली-वाचली असेल. तरीही पुन्हा सांगतो. एका गावातला विठोबा

अस्थी सरोवर तीर्थ महात्म्य

महाभारतातील मोतीकण  - भालचंद्र ठोंबरे एकदा महर्षी अगस्ती ऋषी वेंकटाचलावर (सध्याच्या आंध्र पदेश तिरूमला