Saturday, May 10, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांना चंद्रशेखर बावनकुळे यांचं सडेतोड प्रत्युत्तर



मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य म्हणजे अत्यंत बालिश, बेजबाबदार आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारं आहे, अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला सडेतोड उत्तर दिले आहे.


त्यांनी सोशल मीडियावरून काँग्रेसच्या वक्तव्याचा समाचार घेतला. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की,


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य म्हणजे अत्यंत बालिश, बेजबाबदार आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारं आहे. औरंगजेब हा क्रूर, अत्याचारी, धर्मांध शासक होता, ज्यानं हिंदू धर्म आणि हिंदुस्थानच्या अस्मितेवर आघात केले. त्याची तुलना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्यासारख्या लोकशाहीवादी, सक्षम आणि विकासाभिमुख नेत्याशी करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न आहे.


औरंगजेबानं धर्माच्या नावावर हिंदूंचं शिरकाण केलं, मंदिरं पाडली, कर लादले. देवेंद्रजी मात्र सर्वांना घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून राज्य चालवत आहेत. त्यांच्या काळात हिंदू धर्माला अभिमानानं उभं राहण्याची संधी मिळाली.


औरंगजेबाची तुलना देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी करून काँग्रेस महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करत आहे. सपकाळ आणि काँग्रेसनं खालची पातळी गाठली आहे. त्यांच्या याच बालिश मानसिकतेमुळे काँग्रेसला स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडावं लागतंय आणि असे हास्यास्पद वक्तव्य करून ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, ती सपकाळ आणि काँग्रेसला जागा दाखवून देईल.


Comments
Add Comment