Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीDagdusheth Ganpati : धूलिवंदनानिमित्त 'दगडूशेठ' गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य!

Dagdusheth Ganpati : धूलिवंदनानिमित्त ‘दगडूशेठ’ गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य!

पुणे : राज्यभरात होळी आणि धूलिवंदनाचा (Dhulivandan 2025) सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. सर्वत्र रंगोमय वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान पुणेकरांचे (Pune News) आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Dagdusheth Halwai Ganpati) मंदिरामध्ये देखील धूलिवंदन सणाचा मोठा उत्साह दिसून आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवून द्राक्ष महोत्सव (Grapes Festival) करण्यात आला आहे. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी तसेच मंदिरातील आकर्षक आरास पाहण्यासाठी भाविकांच्या सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे. (Holi 2025)

Gulkand : वाढणार प्रेमाचा गोडवा! ‘गुलकंद’मधील ‘चंचल’ प्रेमगीत प्रदर्शित

काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवून द्राक्ष महोत्सव करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित महोत्सवात नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. त्यानंतर ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, पिताश्री वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. (Dagdusheth Halwai Ganpati)

प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे. द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो. द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्याची हालचाल सुलभ होते. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. हे हिमोग्लोबिन पातळी वाढवते. हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात. त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्यदृष्टया उपयुक्त असल्याने अनाथाश्रम, वृद्धाश्रम व ससून रुग्णालयात द्राक्षांचे प्रसादरुपी वाटप करण्यात येणार आहे, असे ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -