Gulkand : वाढणार प्रेमाचा गोडवा! 'गुलकंद'मधील 'चंचल' प्रेमगीत प्रदर्शित

मुंबई : एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित 'गुलकंद' (Gulkand) या बहुप्रतीक्षित चित्रपटातील पहिलंवहिलं गाणं 'चंचल' नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. चित्रपटातील या सुरेल गाण्यानं रसिकांच्या मनाला हळूवार स्पर्श केलाय. गाण्यात दाखवण्यात आलेली प्रेमाची सुंदर आणि गोड दृश्यं प्रेक्षकांच्या मनात घर करणारी असून या भावपूर्ण गाण्यांना मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे तर अविनाश - विश्वजीत यांनी संगीत दिले आहे. ओठांवर सहज रुळणारं हे गाणं आनंदी जोशी आणि रोहित राऊत यांनी गायलं आहे.



दोन्ही जोडप्यांच्या नात्यांमधील केमिस्ट्री आणि हलक्याफुलक्या क्षणांची गुंफण मनाला भिडणारी असून प्रेमाचे हे सुरेख क्षण या गाण्यातून सुंदरपणे टिपण्यात आले आहेत.

सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांसारखे तगडे कलाकार आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी म्हणतात, " 'गुलकंद' हा चित्रपट म्हणजे प्रेमाच्या गोड आठवणींचा साखरपाकच. प्रेम हा फक्त मोठ्या भावनांचा विषय नसून, ते लहानसहान क्षणांमध्ये, हलक्याफुलक्या हळवेपणात लपलेलं असतं. हेच या गाण्यातून आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे. 'गुलकंद' हा चित्रपट प्रेमाच्या विविध छटांचा वेध घेणारा असून प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला हे गाणं आवडेल.''

निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, " 'गुलकंद' हा प्रेमाचा गोडवा चाखवणारा चित्रपट आहे. प्रेमातील निरागसता आणि त्यातील हलकंफुलकं हास्य हे आम्ही या गाण्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी तुमच्या आमच्या घरातील गोष्ट असल्याचा भास या गाण्यातून होत आहे.''

Comments
Add Comment

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या

सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश शाह यांचे निधन

किडनीच्या आजाराने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास मुंबई: बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध

'क्योंकि सास भी कभी बहू थी' २ मध्ये झळकणार बिल गेट्स

मुंबई : २००० ते २००८ च्या कालावधीत घराघरात पोहोचलेली हिंदी मालिका म्हणजेच 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ही मालिका आता

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार?

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युप्रकरणाला आता तब्बल चार वर्षांहून अधिक काळ उलटला असला तरी या

रितेश देशमुखने शब्द पाळला; पाठपुरावा करुन मृत ज्युनियर आर्टिस्टच्या कुटुंबाला केली लाखमोलाची मदत!

मुंबई : 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान साताऱ्याजवळ कृष्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या सौरभ

The Ganeshutsav Podcast : 'The Ganeshutsav Podcast' (TGP) चा डंका! चिराग चंद्रकांत खिलारे यांनी जगातील पहिले 'हिंदू उत्सव' पॉडकास्ट सुरू करून मूर्तिकारांना दिले व्यासपीठ

मुंबई : भारतातील समृद्ध उत्सव संस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी १७ जुलै २०२४ रोजी 'TGP (The Ganeshutsav Podcast)' या विशेष