धूळवडीच्या दिवशी बॉलिवूडवर शोककळा, अभिनेते देब मुखर्जी यांचं निधन

मुंबई : रंग खेळत मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी धूळवड साजरी केली जात आहे. या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. निर्माते दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचे वडील बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते देब मुखर्जी यांचे शुक्रवार १४ मार्च २०२५ रोजी पहाटे निधन झाले. मागील काही दिवसांपासून देब मुखर्जी यांची तब्येत खालावली होती. अखेर शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८३ वर्षांचे होते.



शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता देब मुखर्जी यांची प्राणज्योत मालवली, असे अयान मुखर्जी यांनी सांगितले. संध्याकाळी चार नंतर त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.



'आंसू बन गए फूल', 'अभिनेत्री', 'दो आंखें', 'बातों बातों में', 'कमीने' आणि 'गुदगुदी' अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये देब मुखर्जी यांनी काम केले होते. त्यांचा मुलगा आयान मुखर्जी आता बॉलिवूडमधली लोकप्रिय दिग्दर्शकांच्या यादीत आहे. नवरात्रउत्सवात देब मुखर्जी विशेष चर्चेत यायचे. ते दरवर्षी 'नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गा पूजा पंडाल'चं आयोजन करत. हा मुंबईतला सगळ्यात मोठा दुर्गोत्सव आहे. यासाठी अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी देखील या दुर्गोत्सवाचे काम करतात. दुर्गोत्सवाला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावली आहे.

देब मुखर्जी यांचे भाऊ जॉय मुखर्जी हे देखील अभिनेता होते. तर दुसरे भाऊ शोमू मुखर्जी. शोमू मुखर्जी यांचं लग्न काजोलची आई तनुजा यांच्याशी झाले. यामुळे देब मुखर्जी हे काजोलचे काका. काजोलला नेहमी त्यांनी लेकीचे प्रेम दिले.
Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : अहिल्यानगरमध्ये दारुगोळा, स्फोटके, संरक्षण साहित्य, सौरऊर्जा प्रकल्प

शेती महामंडळाची साडेचार हजार एकर जमीन देण्यास महसूल विभागाची मान्यता मुंबई : अहिल्यानगर जिल्ह्यातील हरेगाव मळा

Bhayandar Accident : भाईंदरमध्ये शाळेच्या बसला डंपरची धडक

भाईंदर : शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसला मागून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिल्याची घटना

Devendra Fadnavis : सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नुकसानीच्या आकडेवारीसाठी ड्रोनचा वापर करा

 केळी पिकाच्या विम्यासंदर्भात विधानभवनात बैठक; शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याचे आदेश मुंबई, : राज्यातील

Shambhuraj Desai : मुंबईतील पागडी इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासन सकारात्मक; प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांची विधान परिषदेत माहिती

- अधिवेशदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेणार मुंबई : मुंबईतील मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक ठरलेल्या

Pratap Sarnaik : अवैध पार्सल वाहतूक केल्यास खासगी बस चालकांचे लायसन्स होणार सस्पेंड

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; एसटी महामंडळाकडून ८ हजार ३०० बसची खरेदी मुंबई : राज्यात खासगी प्रवासी बसेस चालक,

Devendra Fadnavis : चार महिन्यांत राज्यात २५४ कोटींचे ड्रग्ज जप्त

प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी पथक उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत