छत्तीसगडमध्ये १७ नक्षलवादी आले शरण, शरण आलेल्यांपैकी ९ जणांवर होते २४ लाखांचे बक्षिस

बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यात १७ नक्षलवादी पोलीस आणि सीआरपीएफसमोर शरण आले आहेत. शरण आलेल्या १७ नक्षलवाद्यांपैकी ९ जणांवर मिळून एकूण २४ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. शरण आलेले सर्व नक्षलवादी गंगालूर भागात सक्रीय होते. नक्षलवाद्यांचे अमानवी विचार, आदिवासींवर नक्षलवाद्यांच्या नेत्यांकडूनच सुरू असलेला अन्याय, सुरक्षा दलांचा वाढता प्रभाव ही बदलती परिस्थिती बघून निराश झालेल्या १७ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली.



छत्तीगडमधील नक्षलवाद प्रभावी भागांमध्ये सध्या निया नेल्लानार ही सरकारी योजना सुरू आहे. निया नेल्लानार म्हणजे 'आपले चांगले गाव'. या योजनेला सकारात्मक प्रतिसाद देत बीजापूर जिल्ह्यातील गंगालूर भागात सक्रीय असलेल्या १७ नक्षलवाद्यांनी शरण येण्याचा निर्णय घेतला. शरण आलेल्यांमध्ये दिनेश मोडियम (३६) आहे. दिनेश मोडियम हा माओवादी नक्षलवाद्यांचा डिव्हिजनल कमिटी मेंबर होता. बीजापूर जिल्ह्यातील २६ प्रकरणांमध्ये तपास पथक दिनेश मोडियम याला शोधत होते. त्याच्यावर आठ लाख रुपयांचे बक्षिस लावण्यात आले होते. दिनेशच्या दोन्ही पत्नी, ज्योती टाटी उर्फ काला मोडियम (३२) आणि दुला करम (३२) या दोघी एरिया कमिटी मेंबर होत्या. या दोघींवर प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षिस लावण्यात आले होते.



शरण आलेल्या नक्षलवाद्यांना सरकारी योजनेनुसार २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. तसेच त्यांना मुख्य प्रवाहात सहभागी करुन घेतले जाईल. यंदाच्या वर्षी बीजापूर जिल्ह्यात आतापर्यंत ६५ नक्षलवादी शरण आले आहेत. याआधी मागच्या वर्षी बस्तरमध्ये ७९२ नक्षलवादी शरण आले होते.

नक्षलवाद्यांच्या शरणागतीचा कार्यक्रम स्थानिक पोलीस तसेच डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड, बस्तर फायटर्स, स्पेशल टास्क फोर्स, सीआरपीएफ, कोब्रा बटालियन यांच्या उपस्थितीत झाला.
Comments
Add Comment

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी