 
                            
        
      
    
                            मेम्फिस : अमेरिकेतील टेनेसी (Tennessee) प्रांतातील मेम्फिस (Memphis) शहरात एक धक्कादायक घटना घडली. कुत्र्याचा पाय पडून पिस्तुलमधून एक गोळी सुटली. गोळी लागल्यामुळे कुत्र्याचा मालक जखमी झाला. मालकाची मैत्रीण थोडक्यात वाचली. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती गोळीबार अशी नोंद करुन करुन एफआयआर तयार केली आहे. अपघाती गोळीबार असल्यामुळे कोणाच्याही विरोधात कारवाई होणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
           
          
            भारताने पकडला अमेरिकेचा मोस्ट वाँटेड आरोपी
            
                तिरुअनंतपुरम : सीबीआयने केरळ पोलिसांसोबत संयुक्त कारवाई केली आणि तिरुअनंतपुरममधून अमेरिकेच्या मोस्ट वाँटेड आरोपीला अटक केली. सध्या भारतातील कोठडीत ...
            
           
       
कुत्र्याचा मालक मैत्रीणीसोबत बेडवर होता. त्यावेळी बेडजवळच पिस्तुल होते. पिस्तुल अनलॉक होते. अचानक कुत्रा बेडजवळ आला. त्याने मालकाला बघून बेडवर उडी मारली. कुत्र्याचा पाय चुकून पिस्तुलाच्या ट्रिगरवर पडला आणि एक गोळी सुटली. ही गोळी मालकाच्या मांडीला लागल्यामुळे तो जखमी झाला. मैत्रीणीने त्याला तातडीने रुग्णालयात नेले. वेळेत उपचार झाल्यामुळे कुत्र्याच्या मालकाचा जीव वाचला. मांडीतून गोळी काढण्यात आल्यामुळे आता त्याची प्रकृती स्थिर आहे.
           
          
            सोन्याची तस्करी करण्यासाठी यू ट्युबवरुन घेतले धडे, अभिनेत्री रान्या रावने दिली कबुली
            
                बंगळुरू : सोन्याची तस्करी करण्यासाठी वारंवार दुबई - बंगळुरू असा विमान प्रवास करणारी कानडी अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) हिने तपास पथकाशी बोलताना ...
            
           
       
बेडवर असताना दाखवण्याच्या निमित्ताने पिस्तुल काढणे आणि ते अनलॉक अवस्थेत बेडवर ठेवणे ही गंभीर चूक होती. भविष्यात अशी चूक होणार नाही, अशी कबुली कुत्र्याच्या मालकाने आणि त्याच्या मैत्रीणीने पोलिसांना दिली. पोलिसांनी अपघाताची नोंद करुन दोघांना तोंडी समज दिली आणि आणखी कारवाई करणार नसल्याचे सांगत पुढील कारवाई थांबवली आहे.