तिरुअनंतपुरम : सीबीआयने केरळ पोलिसांसोबत संयुक्त कारवाई केली आणि तिरुअनंतपुरममधून अमेरिकेच्या मोस्ट वाँटेड आरोपीला अटक केली. सध्या भारतातील कोठडीत असलेल्या या आरोपीला लवकरच अमेरिकेच्या ताब्यात दिले जाणार आहे. लिथुआनियाचा नागरिक असलेला अलेक्सज बेसीकोव आणि रशियाचा नागरिक असलेला अलेक्झांडर मिरा सर्डा या दोघांवर अमली पदार्थांच्या तस्करांना, अमली पदार्थांच्या व्यापाऱ्यांना आणि अतिरेक्यांना वित्तपुरवठा करण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर केल्याचा आरोप आहे. मागील अनेक दिवसांपासून अमेरिका बेसीकोव आणि अलेक्झांडर मिरा सर्डा या दोघांना शोधत आहे. हे आरोपी भारतात केरळमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीबीआयने केरळ पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई केली. लवकरच दोन्ही आरोपींना अमेरिकेच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता आहे.
सोन्याची तस्करी करण्यासाठी यू ट्युबवरुन घेतले धडे, अभिनेत्री रान्या रावने दिली कबुली
लिथुआनियाचा अलेक्सज बेसीकोव आणि रशियाचा अलेक्झांडर मिरा सर्डा हे दोघे २०१९ पासून गॅरंटेक्स नावाच्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजचा कारभार हाताळत होते. गॅरंटेक्समध्ये आतापर्यंत ९६ अब्ज डॉलरपेक्षा जास्त व्यवहार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अलेक्सज बेसीकोव हा गॅरंटेक्सशी संबंधित तांत्रिक बाजू हाताळत होता तर अलेक्झांडर मिरा सर्डा गॅरंटेक्सचा सहसंस्थापक आणि मुख्य वाणिज्य अधिकारी म्हणून कार्यरत होता. या प्रकरणात सखोल तपासातून आणखी माहिती हाती येईल.
आर्थिक अफरातफर करण्यासाठीही गॅरंटेक्स नावाच्या क्रिप्टोकरन्सी वापर होत असल्याचा आरोप होत आहे. आरोपी बेकायदा पद्धतीने विनापरवाना गॅरंटेक्स वापरत होते. गॅरंटेक्सद्वारे पैशांची एका देशातून दुसऱ्या देशात रवानगी होत होत होती. या व्यवहारांवर कर दिला नव्हता. बराच काळ सरकारकडे या व्यवहारांची ठोस माहिती पण उपलब्ध नव्हती. याचाच गैरफायदा बेकायदा व्यवहारांसाठी केला जात होता.
आरोपींना क्रिप्टोकरन्सी प्रकरणात किमान २० वर्षांची शिक्षा होऊ शकते. काही आंतरराष्ट्रीय नियमांचे आणि करारांचे उल्लंघन केल्याचाही ठपका आरोपींवर आहे. या प्रकरणांमध्येही दोषी आढळल्यास प्रत्येक प्रकरणासाठी आरोपींना पाच – पाच वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. यामुळे आरोप सिद्ध झाले तर आरोपींचा प्रदीर्घ काळासाठीचा मुक्काम तुरुंगातच असेल.Most Wanted