Saturday, April 19, 2025
Homeक्राईमस्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेची अशी सुरू आहे तपासणी

स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेची अशी सुरू आहे तपासणी

पुणे : स्वारगेट एसटी डेपोमधील दिवे बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये कोंडून तरुणीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणातील आरोपीबाबत एक मोठी अपडेट आली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्या पोलीस कोठडीची मुदत १२ मार्च रोजी संपली. आता आरोपीची रवानगी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडी दिली असली तरी आवश्यकतेनुसार चौकशी करण्याचा पोलिसांचा अधिकार न्यायालयाने अबाधित ठेवला आहे.

होळी आणि धूलिवंदनासाठी मुंबईत ११ हजार पोलिसांचा बंदोबस्त

आरोपी दत्ता गाडेने पीडित तरुणीचा रस्ता अडवून तिला मारहाण केली. यानंतर आरोपीने तरुणीवर दोन वेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समजले आहे. या प्रकरणात आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (२) (एम), ११५ (२) आणि १२७ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोप सिद्ध झाल्यास आरोपीला जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्वारगेट डेपोत शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना फेब्रुवारी महिन्यात घडली. आरोपीविरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. आता आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला कमाल जन्मठेपेपर्यंतची शिक्ष होऊ शकते.

MPSC पदभरती आणि पेपरफुटी, कॉपी, गुणांच्या पारदर्शकतेवर विधानपरिषदेत चर्चा

तपासाचा भाग म्हणून पोलीस कोठडीत असताना आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी स्वारगेट येथे घटनास्थळी नेले. तसेच मूळ गावी गुनाट येथे पण नेले. दत्ता गावात ज्या शेतात लपला होता त्या शेताची पोलिसांनी पाहणी केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत तीस साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. याशिवाय आरोपीचे वीर्य, रक्त, नख आणि केस याचे नमुने संकलित करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. आरोपी आणि तक्रारदार तरुणीची डीएनए चाचणी करण्यासाठी नमुने घेण्यात आले आहेत. पीडितेची वैद्यकीय चाचणी झाली असली, तरी तिचा अंतिम अहवाल अद्याप न्यायालयात सादर करण्यात आलेला नाही. पोलिसांनी आरोपी दत्ता गाडेच्या घराची झडती घेतली. गुन्ह्याच्या दिवशी गाडेने वापरलेला मोबाईल पोलीस शोधत आहेत.

स्वारगेट एसटी डेपोत तरुणीवर बलात्कार, चौघांचे निलंबन आणि २२ जणांची बदली

आरोपी दत्ता गाडेची आवश्यकतेनुसार पुन्हा पोलीस कोठडीत घेऊन चौकशी करण्याचा अधिकार राखून ठेवून त्याला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी शैलेश संखे आणि सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी न्यायालयाकडे केली. बचाव पक्षाच्या वकिलांनी त्याला कपडे पुरविण्याची मागणी केली; तसेच आरोपीशी बोलण्याची संधी देण्याची विनंती केली. गाडेतर्फे अ‍ॅड. सुमीत पोटे आणि अ‍ॅड. वाजेद खान-बीडकर यांनी बाजू मांडली, तर पीडितेतर्फे अ‍ॅड. असीम सरोदे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेऊन आवश्यकतेनुसार चौकशी करण्याचा पोलिसांचा अधिकार अबाधित ठेवत आरोपीला न्यायालयीन कोठडी दिली आहे. आरोपीची रवानगी येरवडा कारागृहात झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -