Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजहोळी आणि धूलिवंदनासाठी मुंबईत ११ हजार पोलिसांचा बंदोबस्त

होळी आणि धूलिवंदनासाठी मुंबईत ११ हजार पोलिसांचा बंदोबस्त

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात गुरुवार १३ मार्च २०२५ रोजी होळी (होलिकोत्सव) आणि शुक्रवार १४ मार्च २०२५ रोजी धूलिवंदन हे सण साजरे होणार आहेत. रमझान महिना पण सुरू आहे. तसेच गुरुवारी पारशी आबान महिन्याची सुरुवात होत आहे. या काळात कायदा – सुव्यवस्था राखण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत ११ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अठराशे अधिकारी आणि नऊ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी यांचा यात समावेश आहे. संवेदनशील ठिकाणी पोलीस बारकाईने लक्ष ठेवणार आहेत.

शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईत गृहनिर्माण संस्था, उत्सव मंडळं, बैठ्या चाळी तसेच नाक्यानाक्यांवर होलिकोत्सव साजरा केला जातो. उत्सवाच्या नियोजनानुसार गुरुवारी संध्याकाळी होळ्या पेटवल्या जातील आणि शुक्रवारी धूलिवंदन साजरे केले जाईल. मुंबईसह अनेक शहरांमध्ये धूलिवंदनाच्या दिवशीच रंग खेळण्याची पद्धत प्रचलित झाली आहे. रंगपंचमीसाठी अनेक शहरांतील कार्यालयांमधून सुटी दिली जात नाही. यामुळे धूलिवंदनाच्या दिवशीच रंग खेळण्याची पद्धत प्रचलित झाली आहे. धूलिवंदनाच्या दिवशी आबालवृद्ध रंग खेळतात. या काळात समाजकंटकांकडून गैरप्रकार करुन उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होऊ नये यासाठी मुंबईत पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेकदा धूलिवंदनाच्या दिवशी छेड काढणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, अश्लील शेरेबाजी असे प्रकार घडतात. जातीय तेढ निर्माण होते. हे टाळण्यासाठी आणि सलोखा राखण्यासाठी पोलीस खबरदारी घेणार आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPSC पदभरती आणि पेपरफुटी, कॉपी, गुणांच्या पारदर्शकतेवर विधानपरिषदेत चर्चा

मुंबईतील चौपाट्या, गर्दीच्या ठिकाणी सतत गस्त सुरू राहील. संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त असेल. मद्यपी वाहन चालक, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या व्यक्ती, महिलांशी गैरवर्तवणूक करणारे, अमली पदार्थाची विक्री तसेच सेवन अशा सर्व बेकायदा कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. बेकायदा कृत्य करताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. ड्रंक अँड ड्राइव्ह मोहिमेसाठी ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करुन सण उत्साहात साजरा करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Fake Paneer : आर्टिफिशल व फेक पनीर विक्री विरोधात कडक कारवाई करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबईत बंदोबस्तासाठी सात अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात १९ पोलीस उपायुक्त, ५१ सहायक पोलीस आयुक्त, १७६७ पोलीस अधिकारी, ९१४५ अंमलदार, राज्य राखीव पोलिसांच्या तुकड्या, शीघ्र कृती दलाची पथके, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, श्वान पथक, गृहरक्षक दलाचे जवान कार्यरत असतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -