पुणे : स्वारगेट एसटी डेपोतील एका दिवे बंद असलेल्या बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची तक्रार तरुणीने पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. परिवहन मंत्र्यांनी अंतर्गत चौकशीअंती एसटी महामंडळाच्या चार अधिकाऱ्यांचे निलंबन केले. तसेच २२ सुरक्षा रक्षकांची बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. स्वारगेट एसटी डेपोमध्ये नव्या सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे निर्देश सुरक्षा मंडळाला देण्यात आले आहेत.
Mumbai Goa : मुंबई-गोवा महामार्गाचे काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार – शिवेंद्रसिंहराजे भोसले
हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून वरिष्ठ आगार व्यवस्थापक (वरिष्ठ व्यवस्थापक स्वारगेट एसटी डेपो) जयेश पाटील, कनिष्ठ आगार व्यवस्थापक (कनिष्ठ व्यवस्थापक स्वारगेट एसटी डेपो) पल्लवी पाटील, सहायक वाहतूक निरीक्षक सुनील येळे, सहायक वाहतूक अधीक्षक मोहिनी ढगे या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले.
महामंडळाच्या कोणत्याही स्तरावर महिला प्रवाशांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल, असे परविहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.