प्रमोद मुजुमदार : ज्येष्ठ पत्रकार, नवी दिल्ली
प्रयागराजमध्ये गेल्या महिन्यात त्रिवेणी संगमामध्ये ४५ दिवसांच्या महाकुंभात सुमारे ६५ कोटी भाविकांनी आस्थेची डुबकी मारली आणि ही सर्व भाविक मंडळी फार भाग्यशाली ठरली आहे. पौष पोर्णिमा ते महाशिवरात्री असा ४५ दिवसपर्यंत चाललेला महाकुंभ १४४ वर्षांनंतर होत असल्याने याचे फार मोठे अनन्य महत्त्व होते आणि या शताब्दीमधील आतापर्यंतची ही सर्वात महत्त्वपूर्ण अविस्मरणीय आणि अकल्पनीय अशी घटना मानली जाईल. त्रिवेणी संगमाच्या काठावर जमलेला अथांग विशाल जनसागर पाहताच मन एकदम भरून येत असे आणि सहजपणे मनात प्रश्न निर्माण होतो की हे काय सुरू आहे? खरोखरच विराट भाविकांचा हा जनसागर म्हणजे जणू भारत देशाला सामाजिक समरसता आणि सांस्कृतिक एकताच्या युग परिवर्तनाचा संकेत मिळाला आहे तसेच महाकुंभच्या माध्यमातून आमची प्राचीन सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा अधिक सुदृढ व समृद्ध झाली आहे तर दुसरीकडे देशाची विशेषतः उत्तर प्रदेशची अर्थव्यववस्था आणि विकास दर चांगला वेगाने मजबूत होणार आणि लोकांचे जीवनमान चांगल्याप्रकारे सुधारेल असा विश्वास प्रमुख अर्थवेत्त्यांनी व्यक्त केला आहे. यादृष्टीने देखील महाकुंभाचे महत्त्व अनन्यसाधारण वाढले आहे. न भूतो न भविष्यती असे वर्णन महाकुंभाचे करता येईल इतके विराट, विशाल असे स्वरुप होते.
महाकुंभ हे काही धार्मिक आयोजन नव्हते तर यामुळे सामाजिक समरसता, सांस्कृतिक और आध्यात्मिक एकता प्रतिष्ठापित झाली आहे तसेच आज समाजामध्ये जातीपातीमध्ये भेदभाव, तणाव, परस्पर विरोध, भांडण, आणि संभ्रम पसरविण्याचा सुनियोजित असा प्रचार प्रसार विरोधी पक्षांकडून सारखा केला जात आहे, त्यास या महाकुंभामध्ये कोट्यवधी भाविकांनी संगमामध्ये डुबकी मारुन चोख उत्तर दिले आहे आणि विरोधकांच्या प्रचारांकडे दुर्लक्ष केले आहे. संगमामध्ये डुबकी मारताना आपले शेजारी कोण उभा आहे हे कोणास माहीत देखील नव्हते आणि कोणी कुणाला तसे विचारले देखील नाही. आपण कोविड महामारीच्या काळांत संपूर्ण देशभरांत लॉकडाउन असल्याने कोणी कुठे बाहेर जाऊ शकत नव्हता, माणसा माणसामधील संबंध दुरावले होते; परंतु या महाकुंभाचे वेळी प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमामध्ये आस्थेची डुबकी मारतांना दुरावलेली माणसे जोडली गेल्याचे पाहावयास मिळाले आणि अशाप्रकारे सामाजिक समरसतेचा परिचय अनुभवला आणि प्रत्यय आला.
महाकुंभाचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल की, यामध्ये सर्व समाजातील अगदी तळागळातील, विभिन्न जाती, धर्म, संप्रदाय, भाषा, विविध चालीरिती मानणारे अथवा नाही मानणारे देखील असे सर्वजण सामिल झाले होते आणि प्रामुख्याने उल्लेखीय असे की, यापूर्वी कधी दक्षिणेकडील तमिलनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक शिवाय पूर्वोत्तर राज्य आसाम, मेघालय, मिजोरम, त्रिपुरा आदी राज्यांतील सनातनी भाविक मोठ्या संख्येने कुंभामध्ये डुबकी मारायला आले होते. तसेच औद्यागिक आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रमुख उद्योगपती आपल्या कुटुंबीयांसमवेत हजेरी लावून गेलेत. सुमारे चार हेक्टर कुंभमेळा क्षेत्र परिसरांत संपन्न झालेल्या या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन, नियोजनाचे श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शनामध्ये एकूण सर्व प्रकारची व्यवस्था मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आपल्या सरकारांतील सर्व सहकारी मंत्री, अधिकाऱ्यांना आपल्या सोबत घेऊन चालण्याची विशिष्ट कार्यशैली आणि सामूहिक कर्तव्य भावनेला ही जाते. महाकुंभामध्ये सुमारे पन्नास देशांचे राजदूत व उच्चायुक्तही आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे कथन अगदी तंतोतंत खरे आणि वस्तुस्थिति दर्शविणारे आहे की, प्रयागराजच्या पवित्र भूमीवर महाकुंभ यशस्वीपणे संपन्न झाला. देशाची जाणीव जागृत होते आणि ती गुलामी मानसिकतेच्या जोखडातून मुक्त होते, तेव्हा ती नव्या ऊर्जेने भारलेल्या ताज्या हवेत मोकळा श्वास घेते. याचाच परिणाम प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून सुरु झालेल्या एकता का महाकुंभ म्हणजेच एकतेच्या महाकुंममध्ये पाहायला मिळाला. मोदी पुढे म्हणतात की, गेल्या वर्षी २२ जानेवारी २०२४ अयोध्यामध्ये रामंदिराच्या प्राणप्रतिष्ठे वेळी मी देवभक्ती आणि देशभक्ती बाबत विचार व्यक्त केले होते. देशात जागृत झालेल्या जाणिवेचे दर्शन अर्थात साक्षात्कार यावेळी घडला असे मोदी यांनी म्हटले आहे.
देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या भारत देशांत परकीय आक्रमणकारी शक्तीनी आपल्या येथील जनसामान्यांना हरप्रकारे नामोहरण, अन्याय, अत्याचार, आपल्या सांस्कृतिक मान्यता, परंपरा, देवीदेवता मंदिरांवर सतत हमले करून आमची श्रद्धास्थाने नष्ठ केली अशा प्रकारच्या वातावरणामध्ये आम्हाला कित्येक वर्षे संघर्षाला सतत तोंड द्यावे लागले आणि स्वातंत्र्यानंतर देखील आमच्याच कांही सत्तालोभी लोकांनी आपल्या पुरातन परंपरा, वास्तू, धार्मिक श्रद्धास्थाने यांची पुनर्स्थापना अथवा पुनर्निर्माण करण्याकडे जसे लक्ष द्यायला पाहिजे होते तसे ते त्या लोकांनी दिले नाही; परंतु नंतर असे दिसू लागले की, ही मंडळी आपल्या आराध्य श्रद्धास्थानाबाबत स्वतःच प्रश्न उपस्थित करतात आणि न्यायालयामध्ये प्रभू श्रीरामचे अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित करतात आणि याचा सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड रोष, चीड, संताप होता आपल्याला नंतर हे लक्षांत आले असेल की, जेव्हा आपले शेजारी बांगलादेशमध्ये तेथील अत्पसंख्याक हिंदू समुदाय आणि त्यांची श्रद्धा पूजास्थानांवर हमले झाले तेव्हा भारतातील हिंदू समुदायामध्ये प्रचंड रोष व तीव्र नाराजी व्यक्त झालेली होती. यानंतर जनसामान्यांमध्ये आपल्या स्व… ची भावना वेगाने जागृत होत असल्याचे अनुभवयाला येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेशन फर्स्ट अर्थात राष्ट्र प्रथम ही भावना दिवसेंदिवस अधिकाधिक बलवत्तर होऊ लागली असल्याचे जाणवत आहे. महाकुंभाचे आयोजनाचे पूर्वी गेल्या वर्षी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश येथील मथुरा येथे संघाच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीच्या वेळी संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबोले यांचेसह कांही प्रमुख ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत महाकुंभाच्या विषयाच्या संदर्भात बोलणी केली आणि महाकुंभाचे आयोजनामध्ये संघाकडून सहयोग आणि सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली होती आणि त्यावेळी संघाने मुख्यमंत्र्यांना आपले पूर्व सहकार्याचे आश्वासन दिले होते.
आरएसएसच्या आणखी एका आनुशांषिक संघटन अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमच्या मार्गदर्शनामध्ये कार्यरत जनजाती सुरक्षा मंचने ६ ते १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत प्रयागराज येथे जनजाती सांस्कृतिक समागमचे आयोजन करण्यात आले होते आणि यामधे सुमारे दहा हजार विभिन्न जनजाती समुदायाचे वनवासी लोग सहभागी झाले होले. यातील अनेक जण प्रथमच त्रिवेणी संगमावर आले होते आणि त्या सर्वांना महाकुंभमधे डुबकी मारण्याचे भाग्य लाभले.देशांतील विद्वान महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज समेत अनेक अन्य धर्माचार्य, संत, महंताचे विचार व मार्गदर्शन आशीर्वाद लाभले आहे. महाकुंभामुळे जवळच असलेल्या अयोध्या व काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शनासाठी भाविकांची गर्दी लोटने स्वाभाविकच होते आणि याची कल्पना उत्तर प्रदेश सरकारला होतीच त्यामुळे राज्य सरकारने ही तशी पुरेशी काळजी, खबरदारी घेतलेली होती. या सर्वाचा परिणाम निश्चितपणे राज्यांतील अर्थव्यवस्थेवर सकारात्मक पडणार आणि पर्यायाने येथील जनसामान्यांचे जीवनमान स्तर उंचावेल असे संकेत प्रसिद्ध अर्थशास्त्री व्यक्त करीत आहे. महाकुंभमुळे मार्च २०२५ च्या शेवटापर्यंत चार दिलियन डॉलरवर भारताची अर्थव्यवस्था पोहोचू शकेल असा विश्वास देशांतील प्रमुख अर्थवेत्त्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे अयोध्येत राम मंदिराच्या पुनर्निर्माणसाठी गेल्या कित्येक वर्षापासून झालेला लम्बा मोठा संघर्ष आणि त्यासाठी अनेकांचे झालेले बलिदान व नंतर देशांत हिन्दुत्व व सांस्कृतिक राष्ट्रवाद जागरण विशेषतः राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारोहानंतर आणि अगदी अलीकडे गेल्या महिन्यांत संपन्न झालेल्या महाकुंभामुळे हिंदू समाज आपल्या सिद्धांत, परंपरा, आस्था, श्रद्धा, म्हणजे मूळ… बैक टू बेसिक… कडे परत येत आहे असे कोणी म्हटले तर ते अतिशयोक्ती होणार नाही.