IPL 2025मुळे पाकिस्तानविरुद्ध नाही खेळणार न्यूझीलंडचे दिग्गज खेळाडू

मुंबई: न्यूझीलंड क्रिकेटने पाकिस्तानविरुद्ध १६ मार्चपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. मायकेल ब्रेसवेलच्या हाती संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. रचिन रवींद्र, मिचेल सँटनर हे खेळाडू २२ मार्चपासून सुरू होत असलेल्या आयपीएल २०२५ लीगमध्ये खेळणार आहे. त्यामुळे ते या टी-२० मालिकेचा भाग असणार नाहीत.


चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर दोन्ही देशांदरम्यानची ही पहिली मालिका आहे. एकीकडे न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचले होते. तर दुसरीकडे यजमान पाकिस्तान ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला होता. पाकिस्तान न्यूझीलंड दौऱ्यावर ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर ३ सामन्यांची वनडे मालिकाही खेळणार आहे. न्यूझीलंडने सध्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. मिचेल सँटनरच्या अनुपस्थितीत ब्रेसवेलला कर्णधार बनवण्यात आले आहे.



आयपीएलमुळे पाकिस्तानविरुद्ध मालिकेत खेळणार नाहीत हे खेळाडू


मिचेल सँटनर आणि रचिन रवींद्र पाकिस्तानविरुद्ध टी-२० मालिकेत सामील नाहीत. दोघेही खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार आहे. सँटनर आयपीएल २०२५मध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळणार तर रचिन रवींद्र चेन्नई सुपर किंग्समध्ये सामील आह.



पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघ


माइकल ब्रासवेल (कर्णधार), फिन एलन, मार्क चॅपमॅन, जॅकब डफी, जॅक फाउलकेस (चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी), मिच हे, मैट हेनरी (चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी), काइल जेमीसन (सुरूवातीच्या ३ सामन्यांसाठी), डेरिल मिशेल, जिमी नीशम, विल ओ'रुरके (सुरूवातीच्या ३ सामन्यांसाठी), टिम रॉबिन्सन, बेन सियर्स, टिम सेफर्ट, ईश सोढ़ी.

Comments
Add Comment

WI vs PAK : ५ षटकात पाच विकेट्स! वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान सामन्यात घडला इतिहास

त्रिनिदाद : वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात सध्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात

Commonwealth Games 2026 : भारतीय खेळाडूंचा जलवा! शर्मिला धनखडच्या सुवर्णपदकासह राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात १० पदकांची भर

ग्लासगो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2026) भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पदकांची लय कायम राखली आहे.

Dnyaneshwari Yadav : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवला महिलांच्या ५३ किलो वजनी गटात रौप्यपदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवला महिलांच्या ५३ किलो वजनी गटात रौप्यपदक ग्लासगो :युवा

ISSF World Cup : चिनी खेळाडूला धूळ चारत ईशा सिंगने जिंकले सुवर्णपदक; कोण आहे इशा सिंग ? मनू भाकरला कांस्यपदकावर मानावे लागले समाधान

हांगझोऊ : जागतिक क्रीडा जगतात भारतीय नेमांबाजांनी पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण केला आहे. चीनमधील हांगझोऊ येथे

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा सुवर्ण जलवा! ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत हॅट्रिक, पंतप्रधान मोदींसह देशभरातून कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्ली : भारतीय वेटलिफ्टिंगची स्टार खेळाडू मीराबाई चानूने (Mirabai Chanu) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ग्लासगो येथे

IND vs ZIM T20 : 'बेबी बॉस' वैभव सूर्यवंशीचा जलवा; झिम्बाब्वेला क्लिन स्वीप देत टीम इंडियाचा दणदणीत विजय

हरारे: भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत शानदार कामगिरी करत यजमान संघाला व्हाईटवॉश