WI vs PAK : ५ षटकात पाच विकेट्स! वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान सामन्यात घडला इतिहास

त्रिनिदाद : वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात सध्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाज जस्टिन ग्रीव्सने इतिहास रचला. त्याने कसोटी सामन्याच्या इतिहासातील सर्वात थरारक स्पेलपैकी एक टाकून संपूर्ण सामन्याचे चित्र बदलून टाकले. ग्रीव्सने त्याच्या पाच षटकांच्या स्पेलमध्ये लागोपाठ पाच मेडन टाकून पाच विकेट्स घेतल्या.



पाच षटकात पाच विकेट्स

या सामन्याच्या सुरुवातीला जस्टिन ग्रीव्सच्या सहा ओव्हर्समध्ये २७ धावा देऊन शून्य विकेट्स होत्या. ग्रीव्हासने आपल्या सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पहिली विकेट घेतली. त्यानंतर त्याने लागोपाठ चार षटकात पाच विकेट्स घेतल्या आणि या पाच षटकांच्या स्पेलमध्ये त्याने एकही रन दिला नाही. या पाचही ओव्हर्स त्याने 'मेडन' टाकल्या आणि प्रत्येक ओव्हरमध्ये त्याने एक विकेट घेतली. डावाच्या शेवटी ग्रीव्हासचा स्कोअर ११ ओव्हर्स, ६ मेडन, २७ रन आणि ५ विकेट असा झाला.




 



 

असा रंगला सामना:


या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी केली. वेस्ट इंडिजकडून शाई होपने १८२ चेंडूंमध्ये ९२ धावांची खेळी करत संघाला ३०० धावांचा टप्पा गाठण्यास मदत केली. या डावात वेस्ट इंडिज संघाने ९८ षटाकत ३११ धावा केल्या तर पाकिस्तानकडून मोहम्मग अलीने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. पाकिस्तानच्या फलंदाजीच्या वेळी पाकिस्तनाचा ओपनर अजान अवैस शून्यवर बाद झाला. त्यानंतर इमाम उल हक आणि शान मसूदने १५५ धावांची भागीदारी केली. यात इमाम उल हकने ६३ आणि शान मसूदने १०९ धावा केल्या .पण ग्रीव्सच्या वादळी स्पेलपुढे पाकिस्तानचा एकही बॅटर टिकू शकला नाही. ग्रीव्सने शतक केलेल्या शान मसूदला बोल्ड केलं, यानंतर त्याने मोहम्मद रिझवानला १२ रनवर, आमिर जमालला ३ रनवर, अली उस्मानला शून्य रनवर आऊट केलं. यानंतर ग्रीव्सने मोहम्मद अब्बासला शून्य रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवून आपल्या ५ विकेट पूर्ण केल्या.



शान मसूदच्या शतकी खेलीनंतर कर्णधार बाबर अझामने २३, सलमान आगाने २०, खुर्रम शहाजादने १९ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून केमार रोच आणि शेमार जोसेफने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानचा पूर्ण संघ ८० षटाकत २८२ धावांवर ऑलआऊट झाली.

Comments
Add Comment

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

ICC Rankings : हॅरी ब्रूकची कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

ICC Ranking : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक पुन्हा एकदा आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत जगातील अव्वल

Rohit Sharma : रोहित शर्माचे जोरदार पुनरागमन; वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी मुंबईच्या बीकेसी मैदानावर सुरू केला सराव

वांद्रे : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा काही काळाच्या विश्रांतीनंतर मुंबईत परतला असून आगामी एकदिवसीय

BWF World Championships : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा धडाका; लक्ष्य, उन्नती विजयी, ट्रीसा-गायत्री उपउपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे.

Women's FIH Hockey World Cup : भारतीय महिलांचा विश्वचषकात धडाका; दक्षिण आफ्रिकेचा 6-1 ने धुव्वा, पुढची फेरी जवळपास निश्चित

ॲम्स्टेलवीन : FIH महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 6-1 असा पराभव