Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजTesla Stock Fall 50% : इलॉन मस्क यांना धक्का! Tesla शेअर्समध्ये मोठी...

Tesla Stock Fall 50% : इलॉन मस्क यांना धक्का! Tesla शेअर्समध्ये मोठी घसरण

वॉशिंगटन डीसी : टेस्ला कंपनीचे प्रमुख इलॉन मस्क यांना (Elon Musk Networth) गेल्या २४ तासांत मोठा फटका बसला आहे. काही काळापासून इलॉन मस्क यांच्या टेस्ला शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे. यामुळे मस्क यांची नेटवर्थ २.५ लाख कोटी रुपयांनी कमी झाली आहे. दुसरीकडे, त्यांची कंपनी एक्स (ट्विटर) देखील तांत्रिक अडचणींचा सामना करत आहे.

शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी यूएस स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आणि त्यादरम्यान इलॉन मस्कच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे शेअर्सदेखील क्रॅश झाले.हा शेअर १५.४३ टक्के घसरुन २२२.१५ डॉलरवर आला. गेल्या वर्षी डिसेंबर पासून टेस्लाच्या शेअरची किंमत आता ५३ % घसरली आहे. टेस्लाच्या शेअरमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे नॅस्डॅक निर्देशांक देखील ४ टक्क्यांनी घसरला.गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात टेस्लाच्या शेअर्सने तुफानी वाढीसह $ ४८८.५४ प्रति शेअर हा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. टेस्लाच्या शेअर क्रॅशचा परिणाम इलॉन मस्क यांच्या नेटवर्थवरही दिसून आला. गेल्या २४ तासांत इलॉन मस्कची एकूण संपत्ती २९ अब्ज डॉलर्स कमी झाली असून, आता ३०१ अब्ज डॉलर्सवर आली आहे. या वर्षात आतापर्यंत मस्कच्या संपत्तीत १३२ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.

Aditi Sharma : अदिती शर्मा आणि अभिनीत कौशिक यांचा गुप्त विवाह अवघ्या चार महिन्यांत संपुष्टात, पण का? – वाचा संपूर्ण प्रकरण

इलॉन मस्क यांचे टेस्लाचा शेअर सोबतचं मायक्रोब्लॉगिंग कंपनी ट्विटर (आता एक्स) देखील अडचणींचा सामना करत आहे. सोमवारी(दि. १०) एक्स प्लॅटफॉर्म दिवसभरात तीनदा क्रॅश झाले, ज्यामुळे जगात खळबळ उडाली. याचा सर्व्हर यापूर्वीही अनेकदा डाउन झाला आहे, मात्र एकाच दिवसात तीनदा डाऊन होण्याची ही पहिलीच घटना आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -