Chef Vishnu Manohar : जागतिक कीर्तीच्या 'शेफ'ची कोण करतेय बदनामी?

'हॅकर' शोधून काढण्यात पोलिसही ठरलेत हतबल!



मुंबई : सोशल मीडिया हॅकिंगचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. अशातच आता महाराष्ट्रातील नवनवीन पद्धतीने विक्रम करणाऱ्या शेफचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेफ विष्णू मनोहर (Chef Vishnu Manohar) यांचं "मास्टर रेसिपी" हे सोशल मीडिया अकाउंट हॅक झालं असून हॅकरने अश्लील मजकूर पोस्ट केल्याने शेफ विष्णू मनोहर यांना बदनामीला सामोरे जावे लागत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर, पुणे, मुंबई सर्वच ठिकाणी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही गेले दहा दिवस पोलीस या हॅकर्सचा शोध लावू शकलेले नाही. प्रथामिक माहितीनुसार मेक्सिकोमधून हे फेसबुक पेज हॅक करण्यात आले आहे. शेफ विष्णू मनोहर यांचं सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्यानंतर त्यांना मोठमोठ्या कलाकारांचे तसेच जवळच्या नातेवाईकांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून अश्लील मजकूराबाबत विचारणा केली. अनेकांनी तर विष्णू मनोहर यांच्यावर टिका केली. सततचे फोन आणि मेसेज मुळे शेफ विष्णू मनोहर (Chef Vishnu Manohar) यांनी पत्रकार परिषद घेऊन या विषयावर मौन सोडले. या परिषदेत बोलताना शेफ विष्णू मनोहर भावुक झाले.



काय म्हणाले शेफ विष्णू मनोहर ?


अशा पद्धतीने सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या अशा हॅकर्सला पोलीस आणि सरकारने धडा शिकवावा अशी मागणी त्यांनी केली. सोबतच चाहत्यांनी माझ्यावर विश्वास कायम ठेवावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. अतिशय मेहनतीने आणि चाहत्यांच्या प्रेमापोटी मी हे कार्य करत होतो. यातून आर्थिक लाभ मिळवणे हा उद्देश कधीही नव्हता, नसणार ही आहे. मात्र एक खाद्य संस्कृति सातासमुद्रापार रुजवण्याचे हे माध्यम माझ्यासाठी होते. एकाएक हा असा प्रकार घडल्याने मी प्रचंड व्यथित झालो आहे. अशी प्रतिक्रिया शेफ विष्णू मनोहर यांनी बोलताना दिली आहे.

Comments
Add Comment

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम