Youth Fitness And Weight Loss : फिटनेसच्या नादात १८ वर्षीय तरुणी जीवाला मुकली!

  80

केरळ : सोशल मीडियाच्या प्रभावामुळे घडलेली एक धक्कादायक घटना केरळमध्ये समोर आली आहे. फिटनेस आणि वजन कमी करण्याच्या नादात १८ वर्षीय तरुणीने आपले प्राण गमावले आहेत. सोशल मीडियावर दिसणाऱ्या फिटनेस ट्रेंडच्या आहारी जाऊन तिने स्वतःच्या आरोग्यावर गंभीर परिणाम ओढवून घेतला.(Youth Fitness And Weight Loss)


ही तरुणी गेल्या सहा महिन्यांपासून वजन कमी करण्यासाठी युट्यूबवरील विविध प्रकारच्या फिटनेस टिप्स फॉलो करत होती. ती फक्त लिक्विड डाएटवर होती आणि विशेष म्हणजे ती गरम पाण्याशिवाय काहीच घेत नव्हती. अन्नाचा पूर्णपणे त्याग केल्यामुळे तिला 'एनोरेक्सिया' हा मानसिक आजार जडला होता. घरच्यांनी तिला अनेकदा अन्न देण्याचा प्रयत्न केला, परंतु ती ते लपवून ठेवायची. वाढत्या वजनाच्या भीतीमुळे तिने डॉक्टरांचा सल्लाही नाकारला होता.(Youth Fitness And Weight Loss)



थलासेरी सहकारी रुग्णालयाचे डॉक्टर नागेश मनोहर प्रभू यांनी सांगितले की, मुलीला १२ दिवसांपूर्वी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचे वजन केवळ २४ किलो इतके कमी झाले होते. ती इतकी अशक्त होती की, तिला बेडवरून उठणेही शक्य नव्हते. तिची शुगर लेव्हल, सोडियम आणि ब्लडप्रेशर सतत घटत होते. अखेर ती व्हेंटिलेटरवर गेली, मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि रविवारी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.(Youth Fitness And Weight Loss)


ही घटना सोशल मीडियावरून मिळणाऱ्या चुकीच्या माहितीकडे तरुणाईने डोळसपणे पाहण्याची गरज अधोरेखित करते. फिटनेस आणि आरोग्याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा अशा प्रकारच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

Comments
Add Comment

प्रधानमंत्री जन धन योजनेत महिलांची ५६ टक्के भागीदारी

नवी दिल्ली : प्रधानमंत्री जन धन योजनेला गुरुवारी ११ वर्ष पूर्ण झाली. ही योजना २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू करण्यात आली

'राष्ट्रीय हितासाठी तीन मुलं जन्माला घाला'

नवी दिल्ली : राष्ट्रीय हितासाठी तीन मुलं जन्माला घाला. हम दो हमारे तीन, हे धोरण राष्ट्रीय हितासाठी अवलंबिले

दरवर्षी २३ सप्टेंबरला साजरा होणार आयुर्वेद दिवस

नवी दिल्ली : भारत सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेत आयुर्वेद दिवसाची तारीख कायमची ठरवली आहे. मार्च २०२५ मध्ये

सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला, दोन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी ठार

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये गुरुवारी भारतीय लष्कर आणि स्थानिक

MLA Crime news : आमदारपुत्राच्या बंगल्यातून २० वर्षीय तरुणीचा झाडाला लटकलेला मृतदेह; हत्या की आत्महत्या?

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील टीकमगढ जिल्ह्यातील खरगापूर विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार चंदा सिंह गौर

नेपाळमार्गे बिहारमध्ये जैशच्या दहशतवाद्यांची घुसखोरी, पोलिसांनी दिला हायअलर्ट

पाटणा : पाकिस्तान पुरस्कृत जैश - ए - मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या किमान तीन दहशतवाद्यांनी नेपाळमार्गे