Rohit Sharma : ‘रोहित खेळू शकतो २०२७ चा वर्ल्ड कप’ : सौरव गांगुली

दुबई : टी-२० वर्ल्ड कप २०२४ जिंकल्यावर रोहित शर्माने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती, त्यानुसार रोहित चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर सुद्धा निवृत्तीची घोषणा करू शकतो अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. मात्र रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांवर माजी कर्णधार सौरव गांगुली याने मोठे वक्तव्य केले आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा फायनल सामना खेळवला जात होता. क्रिकेट विश्वात अशी चर्चा आहे की हा सामना भारताचा कर्णधार रोहित शर्माचा शेवटचा वनडे सामना ठरू शकतो. ज्याप्रकारे टी-२० वर्ल्ड कप २०२४ जिंकल्यावर रोहित शर्माने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती, त्यानुसार रोहित चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर सुद्धा निवृत्तीची घोषणा करू शकतो अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.



मात्र रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांवर माजी कर्णधार सौरव गांगुली याने मोठे वक्तव्य केले आहे. गांगुलीचे म्हणणे की, पुढील आयसीसी टूर्नामेंट येईपर्यंत रोहित निवृत्ती घेणार आणि आणि भारताकडून खेळेल. म्हणजेच गांगुलीचे म्हणणे आहे की रोहित शर्मा २०२७ वर्ल्ड कपमध्ये सुद्धा खेळू शकतो. गांगुली म्हणाला की, त्याने काही महिन्यांपूर्वीच वर्ल्ड कप जिंकला आहे. मला माहित नाही की सिलेक्टर्स काय विचार करतात, पण रोहित खूप चांगले खेळत आहे. भारताचा न्यूझीलंडपेक्षा खूप चांगला खेळ आहे. तसेच आता चॅम्पियन्स ट्रॉफीचे सुद्धा सर्व सामने जिंकत आला असल्याने, तेव्हा हीच टीम खेळणार आहे'. असे गांगुली म्हणाला.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत